Twitter : ट्विटरवर लवकरच येणार नवीन 'Notes' फीचर! यूजर्स मोठा मजकूरही लिहू शकतील आणि...
Twitter Notes Feature : ट्विटर लवकरच एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. 'ट्विटर नोट्स' असं या फीचरचं नाव असणार आहे.
Twitter Notes Feature : सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट म्हणून ओळखलं जाणारं ट्विटर नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवीन फीचर्स अपडेट करत असतात. याचाच एक भाग म्हणून ट्विटर लवकरच एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. 'ट्विटर नोट्स' (Twitter Notes) असं या फीचरचं नाव असणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे. या फीचरसह, यूजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठा मजकूर (मेसेज) लिहू शकतील तसेच शेअरही करू शकतील. नेमके कोणते अपडेट्स या फीचरमध्ये असतील हे जाणून घ्या.
Twitter Notes ची पहिली झलक मे महिन्यात दिसली होती, जेव्हा अॅप संशोधक जेन मंचुन वोंग (Jane Manchun Wong) यांनी या फीचरचा स्क्रीनशॉट एका ट्विटवर शेअर केला होता. ट्विट्सवर सध्या 280 शब्दांची मर्यादा आहे.
टेकक्रंचच्या ताज्या अहवालानुसार, 'ट्विटर नोट्स' फीचरची माहिती समोर आली आहे. असे दिसते की, या फीचरच्या मदतीने, यूजर्स आता ट्विटरवर मोठ्या पोस्ट करू शकतील. हे एक प्रकारचे ब्लॉग पोस्ट असतील असे सांगण्यात आले आहे. तसेच या ब्लॉग पोस्टला पब्लिश केल्यानंतर तुम्ही ती लिंक शेअरसुद्धा करू शकतात. साधारण हे फीचर कसं दिसेल याचा नमुना 'Twitter Write' या अधिकृत साईटवर देण्यात आला आहे.
lovely experience on mobile 🤨 pic.twitter.com/GWOybbpwsI
— Francesco (@napolux) June 22, 2022
सध्या एका लहान समूहातर्फे 'Twitter Notes' या फीचरची चाचणी सुरु आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर यावर अधिकृत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे फीचर जर अपडेट झालं तर यामुळे अनेकांना या फीचरचा लाभ घेता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :