Elon Musk on Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटर डील रद्द करण्याचा दिला इशारा, डेटा लपवल्याचा आरोप
Elon Musk on Twitter: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरचा ट्विटर करार रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
Elon Musk on Twitter: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरचा ट्विटर करार रद्द करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले आहेत की, कंपनी बनावट युजर्सच्या खात्यांचा डेटा लपवत आहे. योग्य डेटा न दिल्यास ते करार रद्द करतील, असे मस्क यांनी सांगितले आहे. त्यांनी ट्विटरला पत्र लिहून हा इशारा दिला आहे.
तत्पूर्वी ट्विटरने करार होल्डवर ठेवण्याच्या मस्क यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले होते. ट्विटरचा विश्वास होता की, त्यांना जर हा डेटा दिला तर मस्क यांना हा करार करण्यासाठी त्यांना मदत होईल. म्हणून ट्विटरने हा डेटा मस्क यांना पुरवला नाही, अशी चर्चा आहे. मस्क म्हणाले होते की, त्यांनी हा करार तात्पुरता थांबवला आहे. ट्विटर त्यांना बनावट खात्यांचा डेटा पुरवणार, याची ते वाट पाहत आहे, असं ते म्हणाले होते.
ट्विटर लिहिलेल्या पत्रात मस्क काय म्हणाले?
पत्रानुसार, मस्क यांचं म्हणणं आहे की, ट्विटर विलीनीकरण करारांतर्गत कंपनी त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्यास पारदर्शकपणे काम करण्यास नकार देत आहे. तसेच मस्क यांनी मागितलेला डेटा कंपनी देत नसल्याचं या पत्रात म्हटलं आहे. मस्क यांच्या वकिलांनी पत्रात म्हटले आहे की, "मस्क यांनी मागितलेला डेटा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, ज्यामुळे ते ट्विटर करार करण्याच्या दिशेने पुढे वाढू शकतील.''
मस्क यांनी स्पष्ट केले आहे की, ट्विटरवरील स्पॅम खाती 5 टक्क्यांपेक्षा कमी असतील तरच ट्विटर अधिग्रहण करार पुढे जाईल. इलॉन मस्क म्हणाले आहेत की, ट्विटरवरील सुमारे 22.9 कोटी खात्यांपैकी किमान 20 टक्के खाती 'स्पॅम बॉट्स'द्वारे चालवली जात आहेत. जे ट्विटरच्या दाव्यापेक्षा 4 पट जास्त आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Tesla चे सीईओ Elon Musk यांची कर्मचाऱ्यांना धमकी, ऑफिस या किंवा नोकरी सोडा
Elon Musk : जॉनी डेप-एम्बर हर्ड यांच्यावर वादावर एलॉन मस्क यांचं ट्विट, म्हणाले...