एक्स्प्लोर
होय! तब्बल 3 कोटींहून अधिक हँडल्स हॅक, ट्विटरची कबुली
मुंबई : तब्बल 3 कोटी 20 लाख ट्विटर अकाऊंट्सचे पासवर्ड्स हॅक झाल्याचे अखेर ट्विटरकडून मान्य करण्यात आले आहे. ट्विटरने एका ब्लॉगच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. शिवाय, यूझर्सना आपापले पासवर्ड्स रिसेट करण्याचं आवाहनही ट्विटरकडून करण्यात आलं आहे.
नेमके किती अकाऊंट्स हॅक झाले आहेत, याची आकडेवारी ट्विटरच्या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद करण्यात आली नाही. मात्र, हॅक झालेल्या अकाऊंट्सची संख्या लाखोंमध्ये आहे, असे ट्विटरने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’शी बोलताना सांगितले.
ट्विटर हॅक केवळ सर्वसामान्य ट्विटर यूझर्सचेच झाले नाहीत, तर जगभरातील अनेक सेलिब्रेटींचे हँडलही हॅक झाले आहेत. यामध्ये केटी पेरी, ड्रेक, मार्क झुकरबर्ग आणि ट्विटरचे सहसंस्थापक इव्हान विलियम्स यांचाही समावेश आहे.
पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?
पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी थोडा हटके पासवर्ड, जो साधारणत: कुणाच्याही लक्षात येणार नाही, असा पासवर्ड ठेवणं गरजेचं आहे. एकाहून अधिक अकाऊंट्सना किंवा कोणत्याही लॉग इन्सना सारखाच पासवर्ड ठेवू नका. तुमच्या नावाशी संबंधित पासवर्ड न ठेवता, किंवा ठेवल्यास त्यात आकडे किंवा स्पेशल कॅरेक्टरर्सचा वापर करा. यामुळे पासवर्ड सुरक्षित राहण्यास मदत होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement