एक्स्प्लोर
व्हायरल सत्य: फेसबुक प्रोफाइलवरुन बँक खातं होऊ शकतं हॅक?
मुंबई: फेसबुकवर आपल्याला अनेक मित्र भेटतात. त्यांच्याशी आपण चॅटही करतो. पण आपल्या फेसबूक प्रोफाइलवरुन आपलं बँक अकांउट हॅक केलं जाऊ शकतं असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण असं होऊ शकतं? जाणून घेऊयात यामागील व्हायरल सत्य.
सोशल मीडियाची दुनिया फारच मोठी आहे. सोशल मीडियातील व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, लाइक आणि शेअरची ही दुनिया तुम्हाला मोठं नुकसान पोहचू शकते.
दावा करण्यात आला आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं बँक अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं. व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये अकाउंट हॅक होण्याच्या पद्धतीही सांगण्यात आल्या आहेत.
सगळ्यात आधी हॅकर फेसबुकवरुन तुमचं नाव आणि जन्म तारखेचा पत्ता लावतात. ही माहिती ते आयकर विभागाच्या वेबसाइटवर अपडेट करतात आणि तिथून आपला पॅनकार्ड नंबर आणि मोबाइल नंबर मिळवतात. त्यानंतर बनावट पॅनकार्ड तयार केलं जातं. यानंतर पोलीस स्थानकात मोबाइल चोरी झाल्याची तक्रार नोंदवतात.
बनावट पॅनकार्डच्या मदतीनं मोबाइल कंपनीमध्ये जाऊन आपल्या मोबाइल नंबरचं सिमकार्ड तयार करुन घेतात. त्यानंतर इंटरनेट बँकिंगच्या माध्यामातून आपल्या बँक अकाउंटमध्ये हस्तक्षेप करतात. बँकेच्या वेबसाइटवर forgot my password हा ऑप्शन सिलेक्ट करतात. त्यानंतरची सगळी प्रक्रिया पार करुन सिमकार्डवर इंटरनेट बँकिंगचा पिन मागवतात.
असाही दावा करण्यात आला आहे की, एकदा का इंटरनेट बँकिंगचा पिन मिळल्यानंतर आपल्या बँक अकाउंटमधून पैसे गायब होतात. असा मेसेज गेले अनेक दिवस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल मेसेजची एबीपी न्यूज पडताळणीसाठी सायबर एक्सपर्ट पवन दुग्गल यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांनी या मेसेजबाबत बरीच महत्वपूर्ण माहिती दिली. सायबर एक्सपर्टच्या मते, आपल्या फेसबूक प्रोफाइलवरुन तुमचं अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं.
अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी आपण आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर जेवढी माहिती आवश्यक आहे तेवढीच शेअर करा. व्हायरल होत असलेला हा मेसेज बहुतांशी खरं असल्याचं समजतं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement