Google Maps: 'या' सोप्या 5 स्टेप्सच्या मदतीने गुगल मॅपवर पाहा ट्रेनचे लाइव्ह स्टेट्स
Google Map Live Train Status : गुगल मॅपच्या मदतीने लांब पल्ल्याच्या ट्रेनचे स्टेट्स पाहता येणे शक्य होणार आहे
![Google Maps: 'या' सोप्या 5 स्टेप्सच्या मदतीने गुगल मॅपवर पाहा ट्रेनचे लाइव्ह स्टेट्स train live locator how to check train live status via google maps know about it Google Maps: 'या' सोप्या 5 स्टेप्सच्या मदतीने गुगल मॅपवर पाहा ट्रेनचे लाइव्ह स्टेट्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/11/b58ddf903ec1d9d9215f1a8303ef9558_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Google Map Live Train Status : गुगल 2019 मध्ये Google Maps मध्ये सार्वजनिक परिवहन वाहुकीशीनिगडीत फीचर्स आले होते. या फीचर्समुळे युजर्सना लांब पल्ल्ल्याच्या मार्गासाठी रिअल टाइम ट्रेनची स्थिती पाहणे, 10 शहरातील वाहतूक कोंडीमध्ये प्रवासाची अपेक्षति वेळ जाणून घेण्यासाठी आणि रिक्षा-सार्वजनिक वाहतुकीबाबतची माहिती मिळवण्यासाठी मदत होणार होती.
लाइव्ह ट्रेन स्टेट्स स्थिती पाहण्यासाठी या फीचर्सचा चांगला उपयोग होतो. या अॅपमुळे ट्रेन स्थानकापर्यंत पोहचण्याची वेळ, ट्रेनची वेळ, ट्रेन किती उशिराने धावत आहे, याबाबत अन्य माहितीदेखील या अॅपमुळे मिळतेय. अशी माहिती देणारे काही थर्ड पार्टी अॅप आहेत. Google Maps वर असलेल्या या फीचर्सचा फायदा कमी स्टोरेज असलेल्या मोबाइल वापरकर्त्यांना अधिक होईल. या फीचर्सला Where is My Train अॅपसह भागिदारीत सुरू करण्यात आले होते.
गुगल मॅपवर हे फीचर्स कसे वापरावे, ट्रेनचे लाइव्ह स्टेट्स कसे पाहावे यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. अॅपमधील हे फीचर्स पाहण्यासाठी तुमच्याकडे गुगलचे अॅक्टिव्ह अकाउंट हवे.
असे करा ट्रेनचे लाइव्ह स्टेट्स:
- सर्वात आधी फोनमध्ये गुगल मॅप सुरू करा
- सर्च बारमध्ये तुम्हाला ज्या स्थानकापर्यंत प्रवास करायचा आहे, ते स्थानक नमूद करा
- आता डेस्टिनेशन पर्यायाखाली असलेल्या टू व्हिलर आणि वॉक या आयकॉन दरम्यान असलेल्या ट्रेन आयकॉनवर टॅप करा
- त्यानंतर ट्रेनच्या आयकॉनमध्ये मार्गावरील पर्यायावर टॅप करा
- त्यानंतर ट्रेनचे लाइव्ह स्टेट्स पाहण्यासाठी ट्रेनच्या नावावर टॅप करा. त्यानंतर तुम्हाला ट्रेनचा लाइव्ह स्टेट्स पाहता येऊ शकते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Elon Musk : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचा ट्विटरच्या संचालक मंडळात समावेश नाही, सीईओ पराग अग्रवाल यांनी सांगितलं कारण
- Google : आता घरच्या घरीच तुमचा मोबाईल करा दुरूस्त! गुगलचा नवा उपक्रम!
- Security Alert : सावधान! गुगलने प्ले स्टोरनं हटवले 'हे' 6 अॅप्स; युजर्सच्या पर्सनल डेटाची चोरी, तुम्हीही करा डिलीट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)