(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Security Alert : सावधान! गुगलने प्ले स्टोरनं हटवले 'हे' 6 अॅप्स; युजर्सच्या पर्सनल डेटाची चोरी, तुम्हीही करा डिलीट
Security Alert : गुगलने (Google) प्ले-स्टोअरवरून (Play Store) असे सहा अॅप काढून टाकले आहेत. हे अॅप्स युजर्सच्या फोनमध्ये व्हायरस पसरवत होते आणि युजर्सची बँक आणि अकाऊंट संबंधित माहिती चोरत होते.
Security Alert : गुगलने (Google) प्ले-स्टोअरवरून (Play Store) असे सहा अॅप काढून टाकले आहेत. हे अॅप्स युजर्सच्या फोनमध्ये व्हायरस पसरवत होते. तसेच सर्व अॅप्समध्ये शार्कबॉट बँक स्टीलर मालवेअर देखील होते जे युजर्सची बँक आणि अकाऊंट संबंधित माहिती चोरत होते. अहवालानुसार, हे मालवेअर अॅप्स 15 हजारहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत. परंतु आता Google ने हे सर्व अॅप्स आपल्या Play store वरून काढून टाकले आहेत. आता तुमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की तुम्हीही या अॅप्सची यादी पाहा आणि तुमच्या फोनमध्ये यापैकी कोणतेही अॅप असल्यास ते लगेच डिलीट करा.
रिपोर्टनुसार, हे सर्व अॅप्स त्याच्या जिओफेन्सिंग फीचर (लोकेशन) द्वारे यूजर्सना ट्रॅक करत होते. सतत ट्रॅकिंग केल्यानंतर, हे अॅप्स युजर्सने लॉगिन केलेल्या सर्व वेबसाइट्स आणि अॅप्सचा डेटा गोळा करून हा डेटा चोरी करत होते. जिओफेन्सिंग फीचर युजर्सने कोणत्याही साइटवर केलेल्या लॉगिनचा डेटा रेकॉर्ड करण्यासाठी वापरले जाते, ज्यामध्ये लॉगिन आयडीपासून पासवर्डपर्यंतचा समावेश होतो. हे अॅप्स इटली आणि ब्रिटनमध्ये अधिक सक्रिय होते.
सिक्युरिटी रिसर्च कंपनी चेक पॉइंटने आपल्या ब्लॉगमध्ये या अॅप्सची माहिती दिली आहे. या सर्व अॅप्समध्ये शार्कबॉट मालवेअर होते. हे युजर्सच्या फोनमध्ये 'ड्रॉपर्स' (Droppers) अॅप डाउनलोड करत होते आणि या अॅपद्वारे युजर्सच्या बँक, अकाऊंट तसेच इतर वैयक्तिक माहिती चोरली जात होती.
गूगलने काढून टाकलेल्या अॅप्सची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
- अॅटम क्लीन-बूस्टर अँटीव्हायरस (Atom Clean-booster Antivirus)
- अँटीव्हायरस सुपर क्लीनर (Antivirus Super Cleaner)
- अल्फा अँटीव्हायरस क्लीनर (Alpha Antivirus Cleaner)
- पावरफुल अँटीव्हायरस क्लीनर (Powerful Cleaner Antivirus)
- सेंटर सिक्युरिटी अँटीव्हायरस (Center Security Antivirus)
- सेंटर सिक्युरिटी अँटीव्हायरस (Center Security Antivirus)
जर तुम्ही यापैकी कोणतेही अॅप तुम्ही वापरत असाल, तर तुम्ही ते ताबडतोब डिलीट करा. कारण तुमची ऑनलाईन बँकिंग फसवणूक होऊ शकते आणि तुमचे कष्टाचे पैसे क्षणार्धात गायब होऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Tata Neu : डिजिटल पेमेंट क्षेत्रात स्पर्धा वाढणार; टाटाचे नवीन अॅप लाँच
- Google Map : गुगल मॅपचे दमदार फीचर, आता प्रवास सुरु करण्यापूर्वीच टोल टॅक्सची किंमत कळणार
- Twitter Edit Button : एलन मस्क यांच्या ट्विटर पोलनंतर ट्विटरचं मिश्किल ट्वीट; म्हणालं, एडिट फिचरची चाचणी मागील एका वर्षापासून सुरु
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha