एक्स्प्लोर
लेस-कॅश इकॉनॉमीसाठी ग्रामीण भागात मोफत इंटरनेट द्या : ट्राय
नवी दिल्ली : केंद्र सरकारचं लेस-कॅश इकॉनॉमीचं ध्येय गाठण्यासाठी ग्रामीण भागात इंटरनेट पोहचणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे 'ट्राय' म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने केंद्र सरकारला ग्रामीण भागात मोफत लिमिटेड इंटरनेट डेटा द्यावा, अशी शिफारस केली आहे.
ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी ही शिफारस करण्यात आली आहे. ग्रामीण भागात दर महिन्याला 100 एमबी मोफत डेटा द्यावा. तसेच या योजनेचा खर्च युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड म्हणजेच सार्वजनिक सेवा निधीतून करण्यात असंही 'ट्राय'ने म्हटलं आहे.
ग्रामीण भागात लेस-कॅश इकॉनॉमीचं ध्येय साध्य करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी सरकारकडून मोफत लिमिटेड डेटा पुरवण्यात यावा, हा डेटा 100 एमबीपर्यंत असेल, अशी शिफारस 'ट्राय'ने केली आहे. त्यामुळे सरकारकडून आता यावर काय विचार केला जातो, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement