एक्स्प्लोर
या तीन गोष्टी सोशल मीडियावर कधीही शेअर करु नका!
मुंबई: सध्या सोशल मीडियाचं युग आहे. त्यामुळे अशावेळी आपण अनेक गोष्ट किंबहुना काही महत्वाची माहिती देखील नकळतपणे सोशल मीडियावर शेअर करतो. पण यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोशल मीडियावर यूर्जस किंबहुना किशोरवयीन यूर्जस बऱ्याचदा महत्वाची माहिती शेअर करतात. राहण्याचं ठिकाण किंवा थेट पत्ता यासारखी महत्वाची माहिती अनेक यूजर्स शेअर करतात. त्यामुळे या माहितीचा चोरी किंवा फसवणुकीसाठी वापर केला जाऊ शकतो. याचबाबत Pew Research Centerनं एक सर्व्हे केला आहे. तसेच कोणती माहिती शेअर करु नये हे देखील या सर्व्हेच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलं आहे.
चालक परवाना माहिती (ड्रायव्हर लायसन्स):
अनेकांना आपलं पहिलंवहिलं ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. अशावेळी अनेक यूजर्स आपल्या लायसन्सचा फोटो थेट सोशल मीडियावर शेअर करतात. पण या लायसन्सवर तुमची जन्मतारीख, फोटो, पत्ता यासारखी फार महत्वाची माहिती असते.
त्यामुळे या महत्वपूर्ण माहितीचा काही समाजकंटक दुरुपयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशी महत्वाची माहिती शेअर करणं टाळा.
लोकशने शेअर करणं टाळा (लोकेशन डेटा):
अनेकदा तुम्ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बाहेरगावी जाता. त्यावेळी आनंदाच्या भरात तुम्ही आता कुठं जात आहात म्हणजेच तुमचं लोकेशन तुम्ही सोशल मीडियावर शेअर करतात.
तसंच आपण घरापासून किती दिवस दूर जाणार आहोत हे देखील अनेक जण त्यावेळी शेअर केलं जातं. अशावेळी तुम्ही घरी नसण्याचा चोर मात्र फायदा घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला घरातील महत्वाचा ऐवज गमवावा लागू शकतो.
बँक खात्याची माहिती (बँक डिटेल्स):
तुमच्या बँक खात्यांची माहिती कधीही सोशल मीडियावर शेअर करु नका. किंवा त्यासंबंधी कोणताही फोटो शेअर करु नका. यामुळे इंटरनेटवरील चोर तुमच्या या माहितीचा वापर करुन तुम्हाला लुटू शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement