एक्स्प्लोर
आता फेसबुकवर ४५ भाषांमध्ये तुमचे मत व्यक्त करा!
मुंबई: फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर लवकरच ४५ भाषांमध्ये आपले मत व्यक्त करता येणार आहे. फेसबुक यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करीत आहे, ज्यामुळे तुम्ही टाकलेली पोस्ट विविध भाषांमध्ये भाषांतरीत करता येऊ शकेल.
वेबसाइट सीएनइटीने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही फेसबुकवर जी पोस्ट लिहाल, त्याला फेसबुकच्या 45 भाषांत भाषांतरीत करण्याचा ऑप्शन दिला जाईल. ज्या भाषा तुम्ही निवडाल त्यामध्ये ती पोस्ट भाषांतरीत होऊन समोरच्या व्यक्तीला वाचण्यास उपलब्ध होईल. या 45 भाषांच्या यादीत फ्रेंच भाषेपासून ते फिलिपीनो भाषेचा समावेश आहे.
या नव्या फिचरची सध्या प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात येत असून, 5000 यूजर्स याचा वापर करीत आहेत. ही चाचणी यशस्वी झाल्यास हे फिचर फेसबुकच्या सर्व यूजर्सना उपलब्ध करून देण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement