एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतात सॅमसंग गॅलक्सी S8 आणि S8 प्लस लाँच
मुंबई : सॅमसंगने गॅलक्सी S8 आणि गॅलक्सी S8 प्लस हो दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. सॅमसंगने तीन आठवड्यांपूर्वी हे दोन्ही स्मार्टफोन अमेरिकेत लाँच केले होते.
सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन 5 मे पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या वेबसाईटवर प्री-बुकिंग आतापासूनच केली जाऊ शकते. काही निवडक ठिकाणी हे फोन ऑफलाईनही विक्रीसाठी उपलब्ध असतील.
सॅमसंग गॅलक्सी S8 ची किंमत 57 हजार 900 रुपये, तर S8 प्लसची किंमत 64 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. हे फोन ब्लॅक, ब्ल्यू आणि गोल्ड कलरमध्ये असतील. अमेरिकेत S8 ची किंमत 46 हजार 700 रुपये, तर S8 प्लसची किंमत 54 हजार 500 रुपये आहे.
प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनी स्मार्टफोनसोबत वायरलेस चार्जर मोफत देत आहेत. इतर देशांमध्ये कंपनी या फोनसोबत AKG हेडफोन्स मोफत देत आहे. यावेळी सॅमसंगने या फोनच्या डिझाईनमध्येही आकर्षक बदल केले आहेत.
गॅलक्सी S8 चे फीचर्स :
- 5.8 इंच एचडी स्क्रिन
- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- बायोमेट्रिक अनलॉक सिस्टीम (फेस डिटेक्शननेही फोन अनलॉक करता येईल)
- सॅमसंग Exynos 8895 प्रोसेसर
- 4 GB रॅम
- 3000 mAh क्षमतेची बॅटरी
- 6.2 इंच एचडी स्क्रिन
- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- बायोमेट्रिक अनलॉक सिस्टीम (फेस डिटेक्शननेही फोन अनलॉक करता येईल)
- 4 GB रॅम
- 3500 mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
ट्रेडिंग न्यूज
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement