एक्स्प्लोर
सॅमसंगचा गॅलक्सी J3 बजेट स्मार्टफोन भारतात लाँच

मुंबई: स्मार्टफोन कंपनी सॅमसंगनं भारतात आपला बजेट स्मार्टफोन गॅलक्सी J 3 प्रो लाँच केला आहे. हा स्मार्टफोन फक्त पेटीएमवर उपलब्ध असून याची किंमत 8,490 रुपये आहे. हा स्मार्टफोन गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन भारतात आता लाँच करण्यात आला असला तरी चीनमध्ये मागील वर्षीच तो लाँच करण्यात आला होता. सॅमसंगचा हा बजेट स्मार्टफोन असला तरीही या स्मार्टफोनमध्ये अनेक नवे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये इतर गॅलक्सी स्मार्टफोनप्रमाणे सिग्नेचर होम बटन देण्यात आलं आहे. सॅमसगं गॅलक्सी J 3 प्रो स्मार्टफोनचे फीचर्स: * 5 इंच एचडी 720x1280 पिक्सल डिस्प्ले * 1.2 गीगाहर्त्झ क्वॉड-कोर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम * इंटरनल मेमरी 16 जीबी असून 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. * ड्यूल सिम सपोर्ट * अँड्रॉईड 5.1 लॉलिपॉपवर आधारित * 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा * 4जी, जीपीआरएस, 3जी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि मायक्रो यूएसबी हे फीचर देण्यात * यामध्ये 2600 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
आणखी वाचा























