एक्स्प्लोर
अॅपल आयफोन 8 लवकरच ग्राहकांच्या भेटीला, नवे फोटो लीक
मुंबई: अॅपल लवकरच म्हणजे या वर्षीच आपले तीन नवे स्मार्टफोन लाँच करु शकतं. अॅपल आयफोन 8, 7 एस आणि 7 प्लस हे स्मार्टफोन बाजारात आणू शकतं.
सोशल मीडियात याचे फोटोही लिक झाले आहेत. यामध्ये आयफोन 8, आयफोन 7 एस आणि आयफोन 7 प्लसचा साचा असलेले फोटो आहेत. असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, 7 एसमध्ये सिंगल कॅमेरा असू शकतो. तर 7 एस प्लस आणि आयफोन 8 मध्ये ड्यूल कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
याशिवाय असाही दावा करण्यात येत आहे की, आयफोन 8 मध्ये नवा 3डी सेन्सर फ्रंट कॅमेरा असू शकतो. नव्या आयफोनचा आकारही थोडासा वेगळा असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या वर्षी सप्टेंबरमध्ये अॅपल आपले नवे स्मार्टफोन लाँच करु शकतो. या तीनही स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगही असू शकतं. आयफोन 7 पेक्षा या नव्या स्मार्टफोनची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे.iPhone X (#iPhone8) with iPhone 7s and 7s Plus. Form is 100% confirmed. Touch ID in power button or display. (99% NOT on the back) pic.twitter.com/Hzj0dihcFe
— Benjamin Geskin (@VenyaGeskin1) May 22, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement