(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रतीक्षा संपली! Renault Kiger ची 'या' दिवशी बाजारात एन्ट्री
Renault Kiger ही आपली नवी कोरी कार कंपनीने लॉन्च केली आहे. स्पोर्टी लूक असणारी ही कार 15 फेब्रुवारी रोजी बाजारात एन्ट्री घेणार आहे.
Renault ने आपली अपकमिंग कार Renault Kiger लॉन्च केली आहे. ही सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही 15 फेब्रुवारी 2021 रोजी भारतात दाखल होणार आहे. कंपनीने या कारसाठी बुकींग आधीपासूनच सुरु केली होती. 10,000 रुपयांपासून 20,000 रुपयांपर्यंत टोकन अमाउंट देऊन प्री-ऑर्डर करु शकता. ही कार 500 डीलरशिप्सवर पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. कारची किंमत पाच लाख रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फिचर्स
Renault Kiger या कारला कंपनीने स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये क्लासी फ्रंट बंपर, वाइड सेंट्रल एयर इनटेक, शार्क फिन अँटिना आणि रुफ माऊंटेड स्पॉइलर देण्यात आला आहे. लायटिंगसाठी यामध्ये LED प्रोजेक्टर हेडलँप, LED डे टाईम रनिंग लाइट्स (DRLs) आणि C शेपच्या LED टेललँप देण्यात आल्याची शक्यता आहे. कारच्या केबिनमध्ये अनेक खास फिचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये ब्लॅक आउट बी पिलर्स, ORVM आणि 16 इंचांचा एलॉय व्हील यांसारख्या फिचर्सचा समावेश आहे.
असं असेल इंटीरियर
इंटीरियरबाबत बोलायचं झालं तर यामध्ये मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, ऑटो क्लाइमेट कंट्रोल, क्रूज कंट्रोल, कूल्ड ग्लोवबॉक्स आणि रियर एयर कंडीशनर वेंट यांसारखे फिचर्स असू शकतात. कारमध्ये कनेक्टिविटीसाठी अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करणारी कनेक्टिव्हिटीही देण्यात आली आहे. कारच्या फ्रंट आणि रियर साइडमध्ये एअरबॅग्स आहेत. अद्याप कारच्या किंमतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारची किंमत 5 ते 6 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
Renault Kiger चं इंजिन
Renault Kiger मध्ये त्याच इंजिनचा वापर करण्यात आला आहे. ज्याचा Nissan Magnite मध्ये वापर करण्यात आला आहे. किगरला दोन इंजिन ऑप्शनसोबत लॉन्च केली जाऊ शकते. ज्यामध्ये BS6 मानकांनुसार, या कारमध्ये 1.0 लीटरचं पेट्रोल इंजिन, जे 71bhp ची पॉवर आणि 96Nmचं टार्ग देईल. तेच 1.0 लीटरचं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल, जे 99bhp च्या पॉवरसोबत 160Nm चा टॉर्क जेनरेट करेल. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि CTV गियरबॉक्ससोबत लॉन्च होऊ शकते.
या कारसोबत स्पर्धा
Renault Kiger ची स्पर्धा भारतीय बाजारांमधील Kia Sonet आणि Hyundai Venue यांसारख्या कार्ससोबत होणार आहे. Nissan Magnite ला ज्याप्रकारे ग्राहकांची पसंती मिळत आहे. ते पाहता Renault Kiger लाही ग्राहकांची पसंती मिळू शकते. रेनो किगर देशातीव किफायतशीर कॉम्पॅक्ट SUVs पैकी एक असेल. ज्यामध्ये सनरुफही देण्यात आला आहे. या कारमध्ये CMF-A प्लस प्लेटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :