एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रिलायन्स आता अमेझॉन, फ्लिपकार्टचीही झोप उडवणार
ग्राहकांकडून सणांमध्ये प्रचंड प्रमाणात खरेदी होत असते. त्यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स आपली सेवा सुरु करणार आहे.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडून आता ऑनलाईन विक्रीमध्ये फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यांना टक्कर दिली जाणार आहे. कारण नुकतीच रिलायन्सने स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज, एसी या प्रोडक्ट्ससह ऑनलाईन विक्रीला सुरुवात केली आहे.
ग्राहकांकडून सणांमध्ये प्रचंड प्रमाणात खरेदी होत असते. त्यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स आपली सेवा सुरु करणार आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स जवळपास 55 ते 60 टक्क्यांपर्यंत विकले जातात.
रिलायन्सनेही विक्रीसाठी स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स ऑनलाईन निवडले आहेत.
‘प्रोडक्ट्सवर मोठी सूट’
‘वेळेनुसार रिलायन्सकडून प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाईल. यामध्ये जुन्या आणि नव्या प्रोडक्ट्सचा समावेश असणार आहे. तसंच काही प्रोडक्ट्स हे रिलायन्सच्या ऑफलाईन स्टोअर्सवरही उपलब्ध होतील. यामध्ये एलजी, सॅमसंग, सोनी या प्रोडक्ट्सचा समावेश असणार आहे,’ असं रिलायन्सकडून सांगण्यात आलं आहे.
‘गेल्या वर्षभरापासून रिलायन्स ऑनलाईन विक्रीसंबंधीचा प्रोजेक्ट आणण्यासाठी काम करत आहे. आम्ही या प्रोजेक्टबाबत खूप उत्साहित आहोत आणि हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत,’ असं रिलायन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
Advertisement