एक्स्प्लोर
जिओ लाँच करणार 1000 रुपये किंमतीचा 4जी स्मार्टफोन?
मुंबई: रिलायन्स जिओ लवकरच बाजारात सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पुढच्या वर्षी म्हणजेच 2017 सालच्या सुरुवातीला सर्वात स्वस्त म्हणजेच 4जी स्मार्टफोन लाँच करु शकतं.
नव्या वर्षी लाँच होणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत अवघी १००० रुपये असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनसोबत जिओचा फ्री व्हॉईस कॉलिंग ऑफर मिळणार आहे.
स्मार्टफोनमध्ये VoLTE सपोर्ट मिळेल. मीडिया रिपोर्टनुसार या स्मार्टफोनचं नाव “LYF Easy” असू शकतं. दरम्यान, जिओकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, जिओ ग्राहकांसाठी अनेक नवनव्या गोष्टी घेऊन येणार असल्याची माहिती मिळते आहे. ज्यामध्ये ब्रॉडबॅण्ड सर्विस सुरु करणार असल्याचीही चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement