(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Realme 10 Launched : 50MP कॅमेरा आणि जबरदस्त फिचर्ससह Realme 10 4G स्मार्टफोन लॉन्च; 'ही' असेल किंमत
Realme 10 Launched : Realme ने आपला नवीन स्मार्टफोन Realme 10 4G लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 4GB + 64GB आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये सादर केला आहे.
Realme 10 Launched : Realme ने नुकताच आपला नवीन स्मार्टफोन Realme 10 4G लॉन्च केला आहे. Realme 10 4G मीडियाटेक चिपसेटवर आधारित आहे. कंपनीने अगदी बडेट फ्रेंडली स्मार्टफोन लॉन्च केला आहे. डिव्हाइस 6.4-इंच AMOLED स्क्रीन, नवीनतम Helio G-सिरीज चिप आणि 50-मेगापिक्सेल कॅमेरासह सुसज्ज आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन कलरमध्ये लॉन्च केला आहे. Realme 10 4G सध्या इंडोनेशियामध्ये लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो.
कंपनीने हा स्मार्टफोन 4GB + 64GB आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये सादर केला आहे. दोन्ही प्रोडक्टची किंमत अनुक्रमे $229 (अंदाजे रु. 18,500) आणि $299 (अंदाजे रु. 24,000) आहे. या स्मार्टफोनच्या दोन कलरमुळे हा स्मार्टफोन अधिक आकर्षक लूक देतो. जे त्यास प्रीमियम फील देतात.
Realme 10 4G तपशील (Realme 10 4G Details) :
Realme 10 4G मध्ये 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश दर 90Hz आहे. स्मार्टफोनमध्ये फुल एचडी + रिझोल्युशन आणि समोर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण आहे. Realme या स्मार्टफोनमध्ये त्याचे स्लिम डिझाईन आणि ग्लॉसी टेक्सचर देखील देत आहे. हा फोन MediaTek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह जोडलेला आहे.
ड्युअल रियर कॅमेरा सेटअप (Realme 10 4G Dual Camera Setup) :
फोटोग्राफीसाठी, Realme 10 4G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सल सेन्सर आणि 2-मेगापिक्सल सेन्सरचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या समोर सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा शूटर आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 33W चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध आहे.
कंपनीचे 5G व्हर्जन देखील लवकरच...(5G Version Soon to be Launched) :
Realme या महिन्याच्या शेवटी या सीरिजमधील Realme 10 आणि इतर डिव्हाईसेसचे 5G व्हर्जनदेखील आणण्याच्या प्रयत्नात आहे. रिपोर्ट्सनुसार, रियलमी कंपनी चीनमध्ये एका इव्हेंटची योजना आखत आहे, ज्यामध्ये Realme 10 5G, Realme 10 Pro आणि Realme 10 Pro +स्मार्टफोनदेखील शोकेस केला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या :
आता इंटरनेटशिवाय पाहता येणार Netflix, Amazon Prime; Jio, Airtel ची होणार सुट्टी