एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
33 रुपयात 1 GB डेटा आणि व्हॉईस कॉलिंग, आरकॉमचा नवा प्लॅन
या प्लॅनमध्ये 1GB डेटासोबत कोणत्याही नेटवर्कवर एका तासासाठी व्हॉईस कॉलिंग करता येणार आहे.
मुंबई : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने 33 रुपयांच्या प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा आणि व्हॉईस कॉलिंग दोन्हीही मिळणार आहे. वेगवेगळ्या सर्कलमध्ये या प्लॅनची किंमत वेगवेगळी असू शकते.
या प्लॅनमध्ये 1GB डेटासोबत कोणत्याही नेटवर्कवर एका तासासाठी व्हॉईस कॉलिंग करता येणार आहे. दोन दिवसांसाठी हा प्लॅन असेल. कंपनीने 2G ग्राहकांना 4G मध्ये अपग्रेड करण्यास सांगितलं आहे. अन्यथा ग्राहकांना सेवेचा लाभ मिळणार नाही.
दरम्यान यापूर्वीही कंपनीने 147 आणि 193 रुपयांचा प्लॅन आणला होता. 147 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा मिळेल.
कंपनीचा हा प्लॅन आरकॉमच्या सर्व सर्कलसाठी उपलब्ध आहे. केवळ 3G ग्राहकांसाठीच हा प्लॅन उपलब्ध असेल. 193 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच हा प्लॅन आहे. मात्र यामध्ये दररोज 1GB डेटासोबत व्हॉईस कॉलिंगसाठी 30 मिनिटंही मिळणार आहेत.
(नोट : या प्लॅननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाईटवरुन करा.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
Advertisement