एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हॉट्सअॅप मेसेजनंतर राडा, पुण्यात पाच तरुणांना बेड्या
पुणे : व्हॉट्सअॅपवर मित्राच्या वाढदिवसाआधीच ग्रुपचं नाव का बदललं यावरुन सुरु झालेला किरकोळ वाद थेट मारामारीपर्यंत पोहचल्याचं समोर आलं आहे. ग्रुपवर ज्याच्याशी गप्पा मारतो त्याच मित्राला गंभीर जखमी करेपर्यंत त्याच्या मित्रांची मजल पोहोचली.
पुण्यातल्या एका मानांकित महाविद्यालयात ही घटना घडली. या महाविद्यालयात बीबीए शाखेत शिकणारा एक विद्यार्थी मित्रांच्याच मारहाणीत गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
शुक्रवारी दुपारी महाविद्यालयात परिक्षेच्या आधी पीडित विद्यार्थ्याशी बोलण्यासाठी दोघे जण गेले. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पीडित आणि त्याचा मित्र बिल्डिंगखाली निघून आले.
संतापलेल्या त्याच्याच मित्रांनी कॉलेजबाहेरचीही काही मुलं आणून पीडित विद्यार्थ्याला मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. मारहाण करताना काही अनोळखी मुलांनी सिमेंट ब्लॉकही डोक्यात घातल्याचं तक्रारीमध्ये लिहिलं आहे.
कलम 143, 147, 148, 149, 307 (खुनाचा प्रयत्न), 323 अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रिकेट
धाराशिव
राजकारण
Advertisement