PM-WANI मुळं देशात येणार Wi Fi क्रांती, जाणून घ्या काय आहेत फायदे?
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत PM-WANI या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळं देशभरात Wi Fi क्रांती घडेल असं सरकारचं मत आहे.
नवी दिल्ली: भारतात वाय-फाय क्रांती आणण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत PM-WANI ही योजना देशभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. PM-WANI म्हणजे पंतप्रधान वाय-फाय अॅक्सेस नेटवर्क इंटरफेस. यामुळे देशभर वाय-फाय क्रांती होण्यास मदत होणार असून त्यामुळे प्रत्येकाला इंटरनेटची उपलब्धता होणार आहे असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.
केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल सांगितले की, "कॅबिनेटने देशभर PM- Wi-fi अॅक्सेस नेटवर्क इंटरफेस योजना लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात व्यापक स्वरुपात वाय-फाय नेटवर्क उपलब्ध होण्यास मदत होणार आहे."
Historic PM-WANI (Wi-Fi Access Network Interface) scheme that has been cleared by the Cabinet today will revolutionise the tech world and significantly improve WiFi availability across the length and breath of India. It will further ‘Ease of Doing Business’ and ‘Ease of Living.’
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2020
कशी असेल योजना? PM-WANI योजनेत तीन मुख्य मुद्दे असतील. पहिला मुद्दा म्हणजे पब्लिक डेटा ऑफिस म्हणजे पीडीओ. या अंतर्गत देशभर पब्लिक डेटा ऑफिस सुरु करण्यात येतील. यासाठी रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स फी आवश्यक नसेल. दुसरा मुद्दा हा पब्लिक डेटा अॅग्रीगेटर हा असेल. याद्वारे पब्लिक डेटा ऑफिसचे अकाउंटिंग आणि कार्यप्रणाली वर देखरेख ठेवली जाणार आहे. तिसरा मुद्दा हा अॅप प्रोव्हायडर हा असेल. या योजनेसाठी एक खास अॅप तयार करण्यात येणार आहे आणि युजर्सना ते डाउनलोड करावं लागेल. त्याचे एक डिजिटल ऑथेंटिकेशन असेल. सरकार याला अॅप स्टोअर सोबत आपल्या वेबसाईटवरही दाखवणार आहे. याच्या जाहिराती आणि लिंक सार्वजनिक करण्यात येतील. त्यानंतर नागरिक देशातील कोणत्याही पब्लिक डेटा ऑफिसमधून वाय-फाय अॅक्सेस करु शकतील.
PM-WANI चे फायदे काय? केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं की, "पंतप्रधान वाय-फाय अंतर्गत पब्लिक डेटा अॅग्रीगेटर आणि अॅप प्रोव्हायडरना सात दिवसांच्या आत रजिस्ट्रेशन करावं लागेल. PM-WANI ही देशातील खूप मोठी क्रांती असेल. यामुळे देशातील प्रत्येक भागात इंटरनेटची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे. यामुळे खेडेगावातील विद्यार्थी आपली पुस्तके डाउनलोड करु शकतात. या योजनेमुळे कौशल्य विकासाचं काम सुलभ होण्यास मदत होईल, व्यापार आणि उद्योगधंद्यांचे काम सुलभ होण्यास मदत होईल. अशा प्रकारचे अनेक फायदे या योजनेमुळे होतील. ही योजना डिजिटल बदलाचं मोठं माध्यम ठरण्याची शक्यता आहे."
महत्वाच्या बातम्या: