एक्स्प्लोर

गावात रेंज नसल्याने जंगलात झोपडी बांधून ऑनलाईन अभ्यास; सिंधुदुर्गातील मुलीची शिकण्यासाठी धडपड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार ही तरुणी गावात मोबाईलला रेंज नसल्याने जंगलात झोपडीत ऑनलाईन अभ्यास करत आहे. पावसातही खंड न पडता तिचा अभ्यास सुरुच आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कणकवली दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार ही तरुणी ऑनलाईन अभ्यासासाठी गावातील डोंगरावर झोपडीत ऑनलाईन अभ्यासाचे धडे गिरवत आहे. 12 वी नंतर गावातून पशुवैद्यकीय पदवीच शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेली. मुंबईतील दिवा भागात भावांसोबत राहत होती. मात्र, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यामुळे ती गावी आली. गावात आल्यानंतर काही दिवसांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु झाला. तीचं दारिस्ते हे गाव तसं दुर्गम खेडेगाव असलेला भाग. ऑनलाईन अभ्यास सुरु झाल्याने गावात इंटरनेट मिळत नसल्याने आजूबाजूला, डोंगरात तिने इंटरनेट कुठे मिळत का? याचा शोध घेतला. उंच डोंगरात तिला इंटरनेट मिळालं. दारिस्ते सारख्या दुर्गम भागात राहणारी स्वप्नाली सुतार या तरुणीने गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसतानाही जिद्द, चिकाटी व मेहनत करत पशुवैद्यकीय पदवीचा तिसऱ्या वर्षांचा ऑनलाइन अभ्यास करत आहे. उराशी बाळगलेली जिद्द पूर्ण करत असताना तिला अनेक अडथळे आले, तरीहि ते अडथळे पार करून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ती धपडत आहे. कोकण म्हटल की डोंगर, दऱ्या खोऱ्याचा भाग, त्यात अनेक ठिकाणी नेटवर्कही मिळत नाही. जिथे नेटवर्क मिळत नाही अश्या ठिकाणी इंटरनेट कुठून मिळणार. त्यात लॉकडाऊन झाल्यावर काही दिवसांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू झाला. मात्र, आपल्या भावांसोबत गावी आलेल्या स्वप्नाली कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावातील सुतारवाडीत गावी आली. गावी आल्यावर काही दिवसात ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू झाल्याने तिला तिच्या गावात इंटरनेटची सेवा मिळत नसल्यामुळे सध्या ही तरुणी जंगलात भर पावसात झोपडीत दिवसभर सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यत अभ्यास करते. गावात रेंज नसल्याने जंगलात झोपडी बांधून ऑनलाईन अभ्यास; सिंधुदुर्गातील मुलीची शिकण्यासाठी धडपड लहानपणी पासून अभ्यासात अत्यंत हुशार असलेली स्वप्नाली सुतार हिने 12 वीत विज्ञान शाखेत 88 टक्के घेत पुढील शिक्षणासाठी पशुवैद्यकीय पदवीसाठी प्रवेश घेऊन मुंबईत गेली. सध्या ती मुंबईत पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचे शिक्षण घेत आहे. अभ्यास करायची जिद्द असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी होण्याच्या ध्येयाने पछाडलेली स्वप्नाली डोंगरात मुसळधार पावसात ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करते. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने गावी आल्यावर कणकवली सारख्या शहरात जाऊन भाड्याची खोली घेऊन अभ्यास करणं शक्य नव्हतं. आईवडील शेतकरी असल्याने घर चालवणं मुश्किल असल्याने वडिलांनी घरी राहून जे शक्य होईल त्या पद्धतीने अभ्यास कर असं मुलीला सांगितलं. भाऊ मुंबईत असल्याने तिला मुंबईत मिळालेल्या पशुवैद्यकीय पदवीच शिक्षण घेणं शक्य झालं. गावात रेंज नसल्याने जंगलात झोपडी बांधून ऑनलाईन अभ्यास; सिंधुदुर्गातील मुलीची शिकण्यासाठी धडपड ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू झाला. मात्र, तिच्या समोर मोबाईल नसल्याने ऑनलाइन अभ्यास कसा करायचा हा प्रश्न पडला. मग तिला भावाने आपला अँड्रॉईड मोबाईल दिला. मोबाईल मिळाल्यावर इंटरनेट शोधत तिने घरापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात तिला पुरेसे इंटरनेट मिळू लागले. त्यामुळे तिने डोंगरात अभ्यास करायचा ठरवलं. मात्र, आईवडील डोंगरात एकटीला पाठवायला तयार नव्हते. तिने आपल्या अभ्यासाचं महत्त्व आईवडिलांना पटवून देत तिने डोंगरात एकटी दिवसभर राहत ऊन पावसाची तमा न करता अभ्यास करतेय. सकाळी जाताना दुपारच्या जेवणाची व्यवस्था करून ती जाते. घरून जेवणाचा डबा, पाणी घेऊन ती सकाळी जाते तो सायंकाळी सहा वाजता घरी येते. गावात रेंज नसल्याने जंगलात झोपडी बांधून ऑनलाईन अभ्यास; सिंधुदुर्गातील मुलीची शिकण्यासाठी धडपड पावसाळ्यापूर्वी डोंगरात झाडाखाली सावलीत किंवा इंटरनेट मिळत नसल्यास उन्हाळ्यात दिवसभर उभं राहून अभ्यास केला. मात्र, पावसाळ्यात सुरू झाला आणि तिच्यासमोर खरा प्रश्न निर्माण झाला. पावसाळ्यात सुरुवातीला पावसाळ्यात देखील तिने छत्री घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. पण पावसामुळे वह्या, पुस्तक भिजायला लागली. त्यात तो कोकणात मुसळधार पाऊस. ही अडचण आणि धडपड तिच्या चारही भावांच्या लक्षात आली. मग डोंगरात तिच्या चार ही भावांनी त्या ठिकाणी छोटीसी झोपडी उभारली. आता अनेक संकटांवर मात करत निसर्गाच्या सानिध्यात तिचा ऑनलाइन अभ्यास सुरु आहे. गावात रेंज नसल्याने जंगलात झोपडी बांधून ऑनलाईन अभ्यास; सिंधुदुर्गातील मुलीची शिकण्यासाठी धडपड स्वप्नालीला डॉक्टर व्हायचं होतं, घरची परिस्थिती हालाकीची असल्याने तिला डॉक्टर होणं शक्य झालं नाही. म्हणूनच तिने पशुवैद्यकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. आईवडील शेतकरी असल्याने घरात जनावरे आहेत. त्यात प्रामुख्याने शेतात किंवा दूध उत्पादन करीत त्या जनावरांचा उपयोग केला जातो. मात्र, त्यांच्यावर वेळीच लस किंवा काळजी घेतली जात नाही. त्यामुळे जनावरांसाठी काहीतरी करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने पशुवैद्यकीय पदवीसाठी प्रवेश घेतला. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा कारभार घरी राहून ऑनलाईन पद्धतीने हाताळत आहेत. राज्याची शिक्षण प्रणाली लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याचा विचार असताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक मुलांना ऑनलाईन शाळा सुरू झाल्या तरीही अभ्यास करता येत नाही. अश्या मुलांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचं मागणी स्वप्नाली सुतार हिने केली आहे. अनेक मुलांना घरच्या घरी अनेक सुविधा मिळून सुद्धा शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलांना स्वप्नालीचा आदर्श घ्यायला हवा. जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपलं ध्येय गाठता येतं हे तिनं दाखवून दिलय. गावात रेंज नसल्याने जंगलात झोपडी बांधून ऑनलाईन अभ्यास; सिंधुदुर्गातील मुलीची शिकण्यासाठी धडपड जंगलात घरापासून दोन किलोमीटर अंतरावर एकटी अभ्यास करत असली तरी तिच्या आईला ती सकाळी घरातून गेल्यानंतर पुन्हा घरी येईपर्यंत काळजी लागून राहिलेली असते. आईला दिवसभर काळजी वाटत असल्याने आई घरातील कुणालातरी पाठवून तिची दिवसातून एक दोन वेळा चौकशी करत असते. इंटरनेट जर घरच्या घरी मिळालं असतं तर तिच्या आईची काळजी मिटली असती. जंगलात माळरानावर गुर चारण्यासाठी आजूबाजूचे शेजारी जातात. त्यांचा काहीसा तिला आधार असतो. जंगलात माळरानावर जरी ऑनलाईन मोबाईलवर अभ्यास करत असली तरी साधारणपणे 11 ते 12 तास मोबाईलची बॅटरी राहत नसल्याने तिला मोबाईलला चार्ज करायचा हा प्रश्न भेडसावू लागला. मात्र, हा प्रश्न तिने आपल्या शिक्षकांना सांगितल्यावर तिच्या एका शिक्षिकेने तिला पावरबँक आणि पेन भेट म्हणून दिलाय. त्यामुळे तीच मोबाईला बॅटरी बॅकअप मिळालं. आता तीला ऊन, पाऊस आणि मोबाईल चार्ज या कुठल्याही गोष्टीना अडचणी येत नाहीत. जिद्द, चिकाटी आणि काही करण्याची इच्छा असली तर आपलं ध्येय गाठू शकतो. Ratnagiri |डोंगरावर झोपडी बांधून कोकणची कन्या करतेय ऑनलाइन पशुवैद्यकीय पदवीचा अभ्यास! स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितलाSanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास! विरार कॅशप्रकरणी संजय राऊतांची तुफान टोलेबाजी...Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरPravin Darekar Full PC : विरार कॅश कांड ते ठाकरेंची बॅग चेक, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Embed widget