एक्स्प्लोर
Advertisement
इंटरनेटवर तुफान व्हायरल होणाऱ्या ‘या’ फोटोमागील सत्य काय?
मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोकडे जेवढा वेळ पाहत राहाल, तेवढं गोंधळात टाकणारा हा फोटो आहे. या फोटोतील तरुण आणि तरुणीच्या शरीराबाबत गोंधळ निर्माण करणारा हा फोटो आहे. पहिल्यांदाच पाहिल्यावर हा फोटो सर्वसाधारण वाटतो, मात्र थोडं निरखून पाहिल्यावर गोंधळ निर्माण होतो.
इंटरनेटवर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ‘Brain Hurt’ (डोकं फिरवणारा) असं या फोटोला नाव देण्यात आलं आहे. रेडिटच्या Blood_Reaper यूझरने हा फोटो शेअर केला आहे.
या फोटोमागील सत्यता सांगताना Musicmonk84 नावाच्या यूझरने म्हटलं आहे की, “या फोटोमध्ये तरुणाने जी पँट परिधान केली आहे, ती काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन्ही रंगातील आहे. पँटचा पांढऱ्या रंगाचा भाग मुलीच्या स्कीनशी पूर्णपणे साम्य दाखवणारा आहे. त्यातच तरुणीने पांढऱ्या रंगाच्या शॉट्स परिधान केल्या आहेत. त्यामुळे पाहणारा पूर्णपणे गोंधळून जातो.”
फोटोच्या खालच्या बाजूस पाहिल्यावर Musicmonk84 नावाच्या यूझरने सांगितलेलं सत्य तुमच्या लक्षात येईल. मात्र, असे असले तरी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो अनेकांच्या करमणुकीचा तर काहींना डोकं चालवायला लावणारा ठरला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement