एक्स्प्लोर
Advertisement
कर्मचाऱ्यांकडून 'पेटीएम'चा डेटा चोरी, कंपनीकडे 20 कोटींची मागणी!
डेटा चोरी करून कंपनीच्या मालकाला डेटा लीक करण्याची धमकी देत 20 कोटी रुपयांची मागणी केली. या प्रकरणी एका महिलेसह तीन कर्मचाऱ्यांना अटक केलीय.
नवी दिल्ली: डिजिटल जगतातील सुप्रसिद्ध कंपनी 'पेटीएम'ला डेटा चोरीचा फटका बसलाय. 'पेटीएम'च्या कर्मचाऱ्यांनीच महत्वाचा डेटा चोरला असल्याची बाब उघडकीस आलीय. डेटा चोरी करून कंपनीच्या मालकाला डेटा लीक करण्याची धमकी देत 20 कोटी रुपयांची मागणी केली. या प्रकरणी एका महिलेसह तीन कर्मचाऱ्यांना अटक केलीय.
'पेटीएम'चे मालन विजय शेखर यांच्या तक्रारीनंतर FIR दाखल करत तीनही कर्मचाऱ्यांना गजाआड केलेय. "धमक्यांच्या फोन कॉल्सने आम्ही खूप त्रासलो होतो, मात्र पोलिसांनी अत्यंत हुशारीने या आरोपींना पकडले", असं कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला या तीन कर्मचाऱ्यांनी डेटा चोरल्याची तक्रार मिळाली होती. हे तिघेजण २० कोटी रुपयांची मागणी करत डेटा लीक करण्याची धमकी देत होते. दरम्यान, पोलिसांनी या तीनही आरोपींना पकडून सखोल चौकशी सुरू केलीय.
मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात 'पेटीएम' मोबाईल वॉलेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. रिक्षा चालकापासून ते लहानातील लहान व्यापाऱ्याकडे सध्या पेटीएम सेवा उपलब्ध आहे. कॅशलेस व्यवहारासाठी नागरिकही पेटीएमचा वापर सहजपणे करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement