एक्स्प्लोर
ओप्पोच्या आगामी 'F7' स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सेलचा?
टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या 'ओप्पो F7' स्मार्टफोनचा ब्रँड अॅम्बेसिडर असणार आहे.
मुंबई : आपल्या स्टायलिश हँडसेटमुळे लोकप्रिय असलेली ओप्पो कंपनी आपला 'F7' स्मार्टफोन लवकरच बाजारात आणणार आहे. 25 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, हे या स्मार्टफोनच्या आकर्षणाचं केंद्र असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
26 मार्च रोजी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात 'ओप्पो F7' स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. ओप्पोनेही या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसाठी खास तयारी केली आहे. सोशल मीडियावरुनही ओप्पो कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रोमोशनल ट्वीट करत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेंस ब्यूटीफिकेशन टेक्नोलॉजी या स्मार्टफोनमध्ये असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शिवाय टीझरवरुन या स्मार्टफोनची आयफोन-एक्सशी तुलना केली जाते आहे.
टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या 'ओप्पो F7' स्मार्टफोनचा ब्रँड अॅम्बेसिडर असेल.
या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत अद्याप कोणतीच माहिती उघड करण्यात आली नाही. त्यामुळे फीचर्ससाठी लॉन्चिंगची वाट पाहावी लागणार आहे.
टीझर पाहून जाणकारांनी फीचर्सचे काही अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार, 6.2 इंच एचडी स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर किंवा मीडियाटेक हेलियो पी 6 चिपसेट, 4 जीबी किंवा 6 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज इत्यादी फीचर्स असू शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement