ओप्पोचा नवीन A7n स्मार्टफोन लॉन्च, 4230 mAh ची बॅटरी आणि ड्युएल कॅमेरा
Oppo A7n फोनमध्ये 6.2 इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला असून ज्याचं रिझॉल्युशन 720x1520 पिक्सल असणार आहे. .या फोनमध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक हीलिओ P35 प्रोसेसर देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोने A5s च्या यशानंतर नवीन आकर्षक फोन लॉन्च केला आहे. Oppo A7n असं या नवीन फोनचं नाव आहे. या फोनमधील जवळपास सर्वच फीचर A5s फोन प्रमाणे आहेत. हा स्मार्टफोन सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत मिळणार आहे.
या फोन जमेची बाजू फोनजी बॅटरी असणार आहे. कारण, Oppo A7n स्मार्टफोनला 4230 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Oppo A7n वैशिष्ट्य
Oppo A7n फोनमध्ये 6.2 इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला असून ज्याचं रिझॉल्युशन 720x1520 पिक्सल असणार आहे. .या फोनमध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक हीलिओ P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये अॅन्ड्रॉईड ओरिओ 8.1 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. फोनच्या मेमरीबाबत बोलायचं झालं तर, फोनला 4 जीबी रॅमसोबत 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. तसेच 256 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवलं जाऊ शकतो.
Oppo A7n फोनला 13+2 मेगापिक्सल ड्युएल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा आहे. Oppo A7n मध्ये 4,230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी 4G, VoLTE, 3G, WiFi, ब्लूटूथ आणि GPS सुविधा फोनमध्ये असणार आहे.