OnePlus 9 Launch Event: OnePlus 9 सीरिज आज लॉन्च होणार, कुठे पाहाल लाईव्ह इव्हेंट?
OnePlus 9 सीरिज लॉन्च इव्हेंट भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसहा वाजता सुरु होईल. हा कार्यक्रम फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पॅनिश आणि इंग्रजी भाषेत प्रसारित केला जाईल.
वनप्लस 9 (OnePlus 9) सीरिजची वाट पाहणाऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. या सीरिजमधील Oneplus 9, Oneplus 9 Pro आणि Oneplus 9Rअं स्मार्टफोन आज लॉन्च होण्याची शक्यता आहे. याशिवाय या कार्यक्रमात कंपनी वनप्लस वॉचदेखील लाँच करणार आहे. वनप्लसचे लाँचिंगचं लाईव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर केलं जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. हा कार्यक्रम फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पॅनिश आणि इंग्रजी भाषेत प्रसारित केला जाईल.
मोबाईल सीरिजची काही वैशिष्ठ्य
OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9e हे तीन फोन लाँच करण्यात येणार आहेत. यामध्ये Hasselblad Pro Mode देण्यात आला आहे. ज्यामुळं प्रोफेशनल फोटोग्राफर्स हे त्यांच्या अनुशंगानं फोटो टीपण्यास याचा वापर करु शकतील. यामध्ये युजर्सना ISO, focus, exposure, white balance आणि इतरही फिचर्स देण्यात आले आहेत.
OnePlus 9 फोनेचे स्पेसिफिकेशन काय असू शकतात?
लीक झालेल्या अहवालानुसार, OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी + फ्लॅट डिस्प्ले असेल. ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज असेल. त्यामध्ये पंच होलही देण्यात येईल. तर OnePlus 9 Pro मध्ये 6.78 इंच फुल क्यूएचडी + डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज असेल. दोन्ही स्मार्टफोनच्या वर उजव्या बाजूला पंच-होल नॉच दिला जाण्याची शक्यता आहे. OnePlus 9 भारतात 54,999 रुपये आणि 59,999 रुपये किंमतीसह लॉन्च केला जाऊ शकतो.
Samsung Galaxy M12; काय आहेत फिचर्स?
कोणता कॅमेरा असू शकतो?
OnePlus 9 सीरिजच्या फोनला मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. यासह, 20 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा अल्ट्रा-वाइड-अँगल आणि OIS सपोर्टसह 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो.
OnePlus स्मार्टवॉच देखील लॉन्च होणार?
वनप्लस 9 सीरिजसह कंपनी आपल्या पहिल्या स्मार्टवॉच देखील लॉन्च करु शकते. वनप्लस वॉच स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.