(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय ग्राहकांची प्रतिक्षा संपली; 15 जूनला पहिल्यांदा ऑनलाईन सेलमध्ये उतरणार OnePlus 8 Pro 5G
स्मार्टफोन युजर्सची प्रतिक्षा संपली असून वन प्लस सीरीजमधील वन प्लस 8 प्रो 5G आणि वन प्लस 8 हे दोन्ही स्मार्टफोन्स 15 जूनपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन कंपनी वन प्लसने आपल्या उत्तम डिझाइन्स आणि परफॉर्मन्सच्या जोरावर ग्राहकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वन प्लस सीरीजच्या स्मार्टफोन्सना बाजारात मोठी मागणी असते. आता या सीरीजमधील पुढील स्मार्टफोन वन प्लस 8 प्रो 5G (OnePlus 8 Pro 5G) येऊ घातला आहे. भारतातही अनेकांमध्ये या स्मार्टफोनबाबत उत्सुकता आहे. अशातच कंपनी सोमवारी 15 जून रोजी आपला नव्या स्मार्टफोनची विक्री भारतात पहिल्यांदा सुरु करणार आहे. याचसोबत वन प्लस 8 ची देखील विक्री करण्यात येणार आहे.
आठवड्यातून 2 दिवसांसाठी होणार लिमिटेड सेल
कंपनीने शुक्रवारी 12 जून रोजी ट्वीट करत माहिती दिली की, वन प्लस 8 सीरीजचे दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री 15 जून दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. ही विक्री अॅमेझॉन आणि वन प्लसच्या वेबसाईटवर होणार आहे. दरम्यान, कंपनीने यावेळी हे देखील स्पष्ट केलं की, ही विक्री मर्यादित असणार आहे, कारण सध्या मागणी फार जास्त आहे.
कंपनीने सांगितलं की, 'वन प्लस 8 सीरीज 5G ची मागणी पूर्ण करण्याचं आमचं ध्येय आहे. पण सध्या स्टॉक स्थिर असल्यामुळे ते शक्य नाही. त्यामुळे सर्व माध्यामांमध्ये या डिव्हाइसची विक्री मर्यादित स्वरूपात होणार आहे.' दरम्यान, कंपनीने सांगितलं की, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक आठवड्यात 2 दिवस म्हणजेच, सोमवार आणि गुरुवार या दोन दिवशी मर्यादित विक्री सुरु राहणार आहे.
दरम्यान, भारतात या स्मार्टफोनची विक्री 29 मेपासून सुरु होणार होती. परंतु, कोरोना व्हायरसमुळे नोएडामधील ओप्पोमधील मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बं करावा लागला होता. या प्लांटमध्ये ओप्पोसोबतच वन प्लस फोनही तयार केला जातो.
वन प्लस 8 प्रो चे स्पेसिफिकेशन आणि किंमत
वन प्लसच्या नव्या सीरीजची ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्वात जास्त उत्सुकता या सीरीजच्या 8 प्रो 5Gची आहे. हा स्मार्टफोन भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याचं एक व्हेरिएंट 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसोबत येत आहे. याची किंमत 54,999 रुपये एवढा आहे. तर 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजची किंमत 59,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. अल्ट्रामरीन ब्लू, ऑनिक्स ब्लॅक आणि ग्लेशियल ग्रीन.
या फोनमध्ये ब्लॅक पॅनलवर 4 कॅमेरा आहेत. 48 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा असणार आहे. ज्यामध्ये सोनीची लेन्स देण्यात आली आहे. 48 मेगापिक्सलचा आणखी एक अल्ट्रा वाइड एंगल कॅमेरा अस्तित्वात आहे. तर सर्वात खाली 5 मेगापिक्सलचा स्पेशल कलर फिल्टर कॅमेरा अस्तित्त्वात आहे. याव्यतिरिक्त 8 मेगापिक्सलचा हायब्रिड झूम कॅमेरा आहे. जो 30X डिझिटल झूम लेन्ससोबत येतो.
या स्मार्टफोन्ससोबत घेणार टक्कर
मार्केटमध्ये या रेंजमध्येही जोरदार टक्कर दिसून येणार आहे. वन प्लस 8 प्रो समोर शाओमी MI 10 (49,999 रुपये) आहे. याव्यतिरिक्त अॅपलचा आधीच आलेला iPhone XS (59,999) आहे. सॅमसंगचा Galaxy S10 (53,999) देखील वन प्लसला टक्कर देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
Twitter fleets | तुम्हाला ट्विटरचं नवं फिचर माहिती आहे का?
वर्षभरासाठी दररोज 1.5 GB डाटा देणारे खास प्लान्स; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
प्ले स्टोअरवरून हटवलं Remove China Apps; गूगलकडून कारण मात्र अस्पष्ट