(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Twitter fleets | तुम्हाला ट्विटरचं नवं फिचर माहिती आहे का?
तुम्ही ट्विटर अपडेट केलं नसेल तर ताबडतोब अपडेट करा म्हणजे या नव्या फिचरचा आनंद घेता येईल.
फेसबुक पासून सुरू झालेलं 'स्टोरी'चं फिचर एवढं लोकप्रिय झालं की इन्स्टाग्राम व्हाट्सअप पासून सगळ्या सोशल साईट्स पर्यंत हा-हा म्हणता पसरलं आणि मग यातून ट्विटर तरी कसं सुटेल? आता फक्त स्टोरी ऑप्शन वेगवेगळ्या सर्व्हिस देणाऱ्या ईमेलच्या इंटरफेसमध्ये यायचा उरलेला आहे. ट्विटर घेऊन आलं आहे Fleet नावाचं नवं फिचर आणि बरंच काही...
तुम्ही ट्विटर अपडेट केलं नसेल तर ताबडतोब अपडेट करा म्हणजे तरच या नव्या फिचरचा आनंद घेता येईल, ट्विटर इंडिया ने काल म्हणजे 9 जूनला याबद्दलचा व्हिडीओ ट्विट करून याची माहिती दिली आहे, नेटिझन्स या नव्या फिचरबद्दल उत्सुक आहेत, हे दिसून येतच आहे. पण तेवढीच नाराजीचा सूर देखील आपल्यास पाहावयास मिळत आहे. हे नवं फिचर ios आणि Android युजर्स साठी सुरू झालं आहे.
यासोबतच ट्विटर ने एक भन्नाट फिचर आहे ते म्हणजे, तुम्ही करत असलेले ट्विट कोणाला पाहता येईल याचा सुद्धा सेटिंग अपडेट झालेल्या आहेत. म्हणजेच, यात मुख्यत्वे तीन ऑप्शन आहेत पहिला : ट्विटरवरील सगळ्यांना तुमचे ट्विट पाहता येतील. दुसरा : फक्त जे तुमच्या फॉलोवर्स ला ते ट्विट पाहता येतील तिसरा : तुम्ही ज्यांची यादी जोडाल त्यांनाच हा ऑप्शन दिसेल.
या सोबतच अलीकडे ट्विटरने बऱ्याच काही नवनवीन गोष्टी नेटिझन्ससाठी आणल्या. यात आपल्या आवडीनुसारचे विषय टॅग निवडल्यास त्या त्या विषयानुसार आपल्याला साधर्म्य असलेले ट्विट आपल्याला होमपेज वर दिसू लागतील.
वर्षभरासाठी दररोज 1.5 GB डाटा देणारे खास प्लान्स; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
कसं वापराल Fleet? आपण जसं फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकायचो आणि त्या चोवीस तासानंतर निघून जायच्या, त्याच्याशीच साधर्म्य साधत आपल्या ट्विटरच्या होमपेजवर एकदम वरच्या बाजूस हे नवं फिचर आलेलं तुम्हाला दिसेल, पहिल्या तुमच्या फोटोवर '+' चं चिन्ह दिसेल त्यावर क्लिक केल्यास, जसं तुम्ही ट्विट करता त्यासारखंच 280 शब्दमर्यादा असलेलं टेक्स्ट हे Fleets मध्ये लिहू शकता, सोबतच फोटो आणि इतर गोष्टी तिथं टाकण्याचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील, तुम्हाला हवा तो मजकूर, फोटो तुम्ही निवडला की खालील बाजूस fleet हे बटन दिसेल ते दाबताच, तुमच्या स्टोरीला म्हणजेच ट्वीटरच्या fleets मध्ये तुमचा कॉन्टेन्ट दिवसभरात 24 तासासाठी दिसेल. एका पेक्षा अधिक fleet तुम्ही add करू शकता.
या नव्या फिचर सोबत नेटिझन्सची क्रिएटिव्हिटी अजून उदयास आलेली पाहायला मिळेल, बऱ्याच वेळा महत्वाच्या सूचना असलेले ट्विट नकळतपणे मिस होतात. ते आता वर दिसत राहतील, ट्रोलर्स किंवा चुकीच्या गोष्टींना मात्र प्रतिसाद दिला नाही तर नक्कीच आपल्या होमपेजवर चांगली माहिती आणि कॉन्टेन्ट वाचायला मिळेल.
तर fleet चा वापर तुम्ही कसा करणार आणि तुम्हालाही हे फिचर कसं वाटलं यावर प्रतिक्रिया ऐकायला नक्की आवडेल.