एक्स्प्लोर
Advertisement
OnePlus 7 : प्री-बुकिंगला सुरुवात, 14 मे पूर्वी बुकिंग करणाऱ्यांना मिळणार 'ही' ऑफर
वनप्लस 7 हा नवीन स्मार्टफोन येत्या 14 मे ला लाँच होत आहे. या फोनबाबत अनेकांना उत्सूकता लागलेली असून त्याचं प्री-बुकिंगही सुरु झाले आहे.
वनप्लस 7 हा नवीन स्मार्टफोन येत्या 14 मे ला लाँच होत आहे. या फोनबाबत अनेकांना उत्सूकता लागलेली असून त्याचं प्री-बुकिंगही सुरु झाले आहे. अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग साईटवर वनप्लस 7 लाँचिंगआधी बुक करता येत आहे. 1000 रुपये इतकी रक्कम भरुन या फोनचं प्री-बुकिंग सध्या करण्यात येत आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 6 महिन्यांसाठी 'अॅक्सिडेंटल स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन' देखील मिळणार आहे.
OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro अशा दोन प्रकारांत हा फोन लाँच केला जाण्याची शक्यता आहे. वनप्लस 7 ची किंमत नक्की किती असेल याबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीकडून या फोनच्या फिचर्स, डिस्प्लेबाबत आतापर्यंत देण्यात आलेल्या माहितीवरुन या फोनची किंमत 50 हजार रुपयांच्या जवळपास असेल असा अंदाज लावला जात आहे. OnePlus 7 ची डिस्प्ले यापूर्वीच्या फोनपेक्षा अधिक चांगला असणार आहे. नवीन फोनच्या डिस्प्लेवर कंपनी तिप्पट खर्च करणार असल्याचंही काही दिवसांपूर्वी वनप्लसचे सीईओ लऊ यांनी सांगितले होते.
वनप्लसच्या मोबाईल फोन्सची किंमत आतापर्यंत 50 हजार रुपयांपेक्षा कमी होती. परंतू OnePlus 7 मध्ये वापरण्यात येणारा डिस्प्ले तसेच इतर नव्या फिचर्समुळे या फोनची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकते असा अंदाज सध्या लावला जात आहे. 14 मे ला रात्री हा फोन लाँच करण्यात येणार आहे. अमेरिका, युरोप आणि भारतात कंपनीकडून लाँचिंग इव्हेंट आयोजित करण्यात आलेले आहेत. तसेच या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील करण्यात येणार आहे.Discover the beauty of HDR10+ on the #OnePlus7Pro. Experience shows and movies the way they were meant to be seen, with rich colors, stunning details and dynamic lighting. https://t.co/ViZaz4Mn5M pic.twitter.com/zjm6l6PUFO
— OnePlus (@oneplus) May 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement