एक्स्प्लोर

नव्या रंगात, नव्या ढंगात, बहुप्रतिक्षित नोकिया 3310 रिलाँच

मुंबई : मोबाईल जगतात क्रांती करणाऱ्या नोकिया कंपनीने 3310 या मोबाईल हँडसेटला नव्या स्वरुपात ग्राहकांसाठी बाजारात आणलं आहे. सोबतच नोकिया 5, नोकिया 6, नोकिया 3 चे नवे मॉडेल लाँच केले आहेत. स्पेनमधील बार्सिलोनात झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस या टेक इव्हेंटमध्ये हे फोन लाँच करण्यात आले. नोकिया 3310 मध्ये 2.4 इंचाची कव्हर्ड स्क्रीन आणि बटन असलेला की-बोर्ड असणार आहे. 2 मेगापिक्सलचा फ्लॅश लाईट कॅमेरा, हेडफोन, ड्युअल सिम, एफएम रेडियो, 16 एमबी इंटरनल स्टोरेज क्षमता जी 32 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या मोबाईलची बॅटरी 1200 mAh क्षमतेची आहे. तब्बल 17 वर्षांनंतर नोकिया 3310 नव्या स्वरूपात येत आहे.  2005 साली बंद झालेल्या या मोबाईलचे 12 कोटींपेक्षाही जास्त युनिट विकल्या गेले होते. नव्या रंगात, नव्या ढंगात, बहुप्रतिक्षित नोकिया 3310 रिलाँच ... म्हणून नोकिया 3310 रिलाँच स्मार्टफोनच्या जमान्यात अनेकांना सेकंडरी फोन म्हणून फीचर फोनची आवश्यकता असते. नोकिया 3310 हा दमदार बॅटरी बॅकअप असणारा फोन आहे. त्यामुळे स्मार्टफोन युझर्स या फोनला सेकंडरी फोन म्हणून वापरतील, असं कंपनीचं म्हणणं आहे. एचएमडी ग्लोबल या फिनलँडच्या कंपनीने हा फोन लाँच केला आहे. नोकियाचा परवानाही याच कंपनीकडे आहे. या कंपनीने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये नोकिया 6 हा फोन लाँच केला असून हा फोन अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. नोकिया 3310 ची पाच वैशिष्ट्ये नोकिया 3310 बद्दलच्या सर्व अफवा खऱ्या ठरल्या असून अनेक नवीन फीचर्ससह हा फोन बाजारात आला आहे
  • किंमत
नोकिया 3310 युरोपमध्ये 3450 रुपयात उपलब्ध असेल. मात्र इतर ठिकाणची या फोनची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
  • कलर डिस्प्ले
नवीन नोकिया 3310 मध्ये आता कलर डस्प्ले देण्यात आला आहे. 2.4 इंच आकाराच्या या डस्प्लेमध्ये विविध प्रकारचे वॉलपेपर देण्यात आले आहेत.
  • कॅमेऱ्याचा समावेश
नोकिया 3310 च्या नव्या मॉडेलमध्ये कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रायमरी कॅमेऱ्याचा वापर करता येईल. मात्र यामध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला नाही.
  • स्नेक गेम
नोकिया 3310 युझर्सची सर्वात आवडत्या स्नेक गेमचा या फोनमध्ये पुन्हा या फोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. मल्टीकलरमध्ये गेम या फोनमध्ये देण्यात आली आहे.
  • दमदार बॅटरी बॅकअप
जुन्या नोकिया 3310 प्रमाणेच या फोनमध्येही दमदार बॅटरी देण्यात आली आहे. 1200 mAh क्षमतेची ही बॅटरी 22 तासांचा टॉक टाईम बॅकअप देते, असा कंपनीचा दावा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhanu Pania : फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pavna Lake Youth Drowned : मित्रांना वाटलं मस्ती करतायत, डोळ्यासमोर दोन मित्र बुडाले!ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 December 2024Azad Maidan Oath Ceremony : आझाद मैदनावरुन थेट आढावा, लोकांची प्रचंड गर्दी #abpमाझाOath Ceremony Seating Arrangement : कुणाची खुर्ची कुणाच्या शेजारी? कोण पुढच्या रांगेत? कोण मागे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhanu Pania : फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Priyanka Gandhi Meets Amit Shah : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट अमित शाहांच्या भेटीला! नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट झाली?
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट अमित शाहांच्या भेटीला! नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट झाली?
मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?
मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?
Eknath Shinde: बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
Devendra Fadnavis Profile : बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री...  घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री... घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास
Embed widget