एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'इस्रो'चा मेगा प्लॅन, भारतात नव्या इंटरनेट युगाची सुरुवात
नवी दिल्ली : भारताने गेल्या वर्षी अमेरिकेला मागे टाकत सर्वात जास्त इंटरनेटचा वापर करणारा देश म्हणून चीन पाठोपाठ दुसरा क्रमांक मिळवला. मात्र भारत इंटरनेट स्पीडच्या बाबती अजूनही अनेक आशियाई देशांच्या तुलनेत पिछाडीवर आहे.
मात्र भारतात येत्या 18 महिन्यात हाय स्पीड इंटरनेट युगाची सुरुवात होणार आहे. ‘इस्त्रो’ने त्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो तीन उपग्रह पुढच्या 18 महिन्यात अंतराळात सोडणार आहे. ज्यामुळे संपूर्ण भारतातला इंटरनेट स्पीड वाढणार आहे.
यापैकी पहिलं कम्युनिकेश सॅटेलाईट म्हणजे जी-सॅट 19 हे जून महिन्यातच अंतराळात पाठवलं जाईल. त्यानंतर जी-सॅट 11 आणि जी-सॅट 20 प्रक्षेपित केलं जाईल, अशी माहिती ‘इस्रो’ चेअरमन किरन कुमार यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली.
या वर्षाच्या अखेरपर्यंत जी-सॅट 11 हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. याद्वारे 13 गीगाबाईट डेटा प्रति सेकंद ट्रान्सफर केला जाऊ शकतो. तर 2018 च्या अखेरपर्यंत जी-सॅट प्रक्षेपित करण्याची योजना आहे, ज्याद्वारे 60 ते 70 गीगाबाईट प्रति सेंकद एवढा डेटा स्पीड मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
ठाणे
Advertisement