एक्स्प्लोर
ह्युंदाईच्या नव्या कारचं आज लाँचिंग, पाहा या कारची किंमत
मुंबई: ह्युंदाईची नवी एलांट्रा सेडान ही नवी कार लाँचिगसाठी सज्ज झाली आहे. आज ही कार लाँच करण्यात येणार असून या कारच्या सुरुवातीची किंमत 15 लाख एवढी असण्याची शक्यता आहे.
या कारची स्पर्धा स्कोडा ऑक्टाव्हिया, फॉक्सवॅगन जेट, शेवरले क्रूज यांच्याशी असणार आहे. दरम्यान, या नव्या कारचं बुकींगही सुरु झालं असून कंपनीनं बुकींग किंमत 25,000 रु. आहे. पण बुकींगबाबत कंपनीनं कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन व्हर्जन मिळणार आहेत. दोन्ही इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन असणार आहे.
ह्युंदाईनं नव्या फ्ल्युडिक स्कल्प्चर डिझाइन थीमवर तयार केलं आहे. यामध्ये 7.0 आणि 8.0 इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेट सिस्टम देण्यात आली आहे.
या नव्या कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेकडे बरंच लक्ष दिलं आहे. सुरक्षेसाठी यामध्ये 7-एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) यासारखे फीचर देण्यात आले आहेत.
सोर्स: कार देखो डॉट कॉम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement