एक्स्प्लोर
शब्द मोजणारं ‘काऊंटिंग पेन’, काश्मीरच्या मुलाचं संशोधन
गुरेझ खोऱ्यातील तुलैलमधील सरकारी शाळेत तिसरीच्या इयत्तेत मुझफ्फर अहमद खान शिकत आहे. गुरेझ हे श्रीनगरपासून 123 किमी, तर बंदीपोरा जिल्ह्यापासून 86 किमी अंतरावर आहे.
श्रीनगर : गोळीबार, दगडफेक यांसारख्या हिंसक घटनांमुळे जम्मू-काश्मीर कायमच बातम्यांच्या केंद्रस्थानी असतं. याच काश्मीरमधून सकारात्मक बातमी आहे. नऊ वर्षाचा मुलगा काश्मीरच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आशादायी चेहरा बनला आहे. मुझफ्फर अहमद खान असे या मुलाचे नाव आहे. त्याने अनोखं संशोधन केले आहे.
नऊ वर्षाच्या मुझफ्फर अहमद खान याने ‘काऊंटिंग पेन’ बनवले आहे. या पेनने आपण लिहित गेल्यास, जेवढे शब्द आपण लिहिले आहेत, ते मोजण्याचे फीचर या पेनमध्य आहे. यासाठी पेनला एक छोटीसं एलसीडी जोडण्यात आले आहे. शिवाय, मोबाईलशी जोडून मेसेजच्या माध्यमातूनही या पेनने जोडलेल्या शब्दांची संख्या समजू शकते.
गुरेझ खोऱ्यातील तुलैलमधील सरकारी शाळेत तिसरीच्या इयत्तेत मुझफ्फर अहमद खान शिकत आहे. गुरेझ हे श्रीनगरपासून 123 किमी, तर बंदीपोरा जिल्ह्यापासून 86 किमी अंतरावर आहे.
राष्ट्रपती भवनात नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनतर्फे देशभरातील नवनवीन संशोधनांचं प्रदर्शन आयोजित केले जाते. त्या प्रदर्शनात मुझफ्फर अहमद खान याच्या ‘काऊंटिंग पेन’ही ठेवण्यात आले होते.Jammu and Kashmir: Nine-year-old Muzaffar Ahmad Khan from Bandipora's Gurez has invented a ‘counting pen’, a pen that counts words while writing. The prototype of the pen was displayed at the Festival of Innovation and Entrepreneurship, organized by NIF at the Rashtrapati Bhavan pic.twitter.com/if8fvunuNA
— ANI (@ANI) April 16, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement