एक्स्प्लोर

1 एप्रिलपासून व्हॉईस कॉलिंग मोफत, अंबानींकडून नव्या ऑफरची घोषणा

मुंबई : रिलायन्स जिओची 'हॅप्पी न्यू ईयर' ऑफर 31 मार्चला संपल्यानंतर 1 एप्रिलपासून दर आकारले जाणार आहेत. मात्र केवळ डेटा पॅकसाठी पैसे लागणार असून व्हॉईस कॉलिंग सेवा मोफत करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींनी मुंबईत जिओच्या नव्या योजनांची घोषणा केली. 'जिओ प्राईम मेंबरशिप' ही नवी योजना त्यांनी लाँच केली आहे. 1 ते 31 मार्चदरम्यान जिओची मेंबरशिप घेता येईल. काय आहे जिओ प्राईम मेंबरशिप? सध्या जिओ वापरत असलेल्या किंवा 31 मार्चपर्यंत जिओ सिम घेतील अशा ग्राहकांना 99 रुपयात प्राईम मेंबरशिप घेता येईल. या ऑफरनुसार जिओची मोफत 4G डेटा सेवा आणखी एक वर्षासाठी मिळेल. 1 मार्च ते 31 मार्च या काळात मेंबरशिपसाठी नोंदणी करता येईल. जिओचे नवे दर आणि मेंबरशिपचे इतर फायदे लवकरच जिओ अॅपवर जाहीर केले जातील. मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप एक वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल, असं अंबानींनी सांगितलं. मेंबरशिप घेतल्यास 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा (1GB प्रतिदिन) वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे. जिओ प्राईम मेंबरशिप कशी मिळवाल? प्राईम मेंबरशिप जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवरुन मिळवता येईल. शिवाय जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल. ‘’2017 अखेरपर्यंत संपूर्ण देशात जिओ नेटवर्क असेल’’ 2017 अखेरपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात जिओ नेटवर्क उपलब्ध असेल, अशी घोषणा अंबानींनी केली. तर एकूण 4G मोबाईल धारकांपैकी 99 टक्के युझर्सकडे जिओ असेल, असा दावाही त्यांनी केला. एका दिवसात जिओ युझर्स व्हॉईस कॉलिंगचा वापर 200 कोटी मिनिट एवढा करतात. तर जानेवारीमध्ये एकूण 100 कोटी GB डेटा वापरण्यात आला असून प्रतिदिन 3.3 कोटी GB डेटा वापरण्यात येतो, असं अंबानींनी सांगितलं. डेटा हा डिजिटल युगाचा श्वास आहे, त्यामुळे डिजिटल होण्यासाठी ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी जिओ कटिबद्ध आहे. सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांमध्ये भारत सध्या अव्वल क्रमांकावर आहे. येत्या काळात आणखी बदल होतील, असं अंबानींनी सांगितलं. 5 सप्टेंबर 2016 रोजी जिओने 31 डिसेंबर 2016 पर्यंत मोफत सेवा दिली होती. त्यानंतर ही सेवा हॅप्पी न्यू ईयर ऑफरअंतर्गत चालू ठेवली आणि 31 मार्चपर्यंत जिओ युझर्सना मोफत सेवा दिली. मात्र आता दर आकारले जाणार आहेत. संबंधित बातम्या :

जिओ मार्चनंतर आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत?

रिलायन्स जिओ 1500 रुपयांहून कमी किंमतीचा 4G स्मार्टफोन लॉन्च करणार?

रिलायन्स जिओ इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्येही नंबर वन!

व्हायरल सत्य : 18 जानेवारीनंतर जिओ सिम बंद होणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Embed widget