एक्स्प्लोर
4 GB रॅम, दमदार बॅटरी, 'मोटो झेड'ची भारतात लॉचिंग

मुंबई : मोटोरोलाचा 'मोटो झेड' सीरीज आज भारतात लॉन्च होणार आहे. मोटोने आपली झेड सीरीज जूनमध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोतील 'लेनोवो टेक वर्ल्ड 2016'मध्ये लॉन्च होती. सध्या कंपनीकडून या सीरीजच्या लॉन्चिंगसंदर्भातील संदेश ग्राहकांना पाठवले जात आहेत. https://twitter.com/Moto_IND/status/782822773307551744 मोटोरोला आपल्या 'मोटो झेड' सीरीजमधील कोणते स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरवणार हे अद्याप स्पष्ट केलं नाही. पण मोटो झेड, मोटो झेड फोर्स, आणि मोटो झेड प्ले हे तीन फोन आज भारतात लॉन्च होणार आहेत. या फोनसोबत मोटो मोड्सही भारतात लॉन्च केले जाणार आहे. 'मोटो झेड'चे फीचर्स ऑपरेटिंग सिस्टीम : अॅड्रॉईड मार्शमेलो 6.0.1 रॅम : 4 जीबी कॅमेरा : 13 मेगापिक्सेल रिअर आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट प्रोसेसर : क्वालकोम स्नॅपड्रॅगन 820 मेमरी : 32 आणि 64 जीबी डिस्प्ले : 5.5 इंचाचा अमोलेड क्यूएचडी डिस्प्ले बॅटरी : 2600 mAh ते 3500 mAh काय असेल वेगळेपण?
- होम स्क्रीनवर फिंगरप्रिंट स्कॅनर
- यूएसबी टाईप-सी पोर्ट
- 3.5 मीमी हेडफोन जॅक नसेल
- टर्बोचार्जमुळे 15 मिनिटांत 8 तासांसाठीचं चार्जिंग
आणखी वाचा























