एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोटो जी4 स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या हातात, विक्रीची तारीख जाहीर
मुंबई: स्मार्टफोन कंपनी मोटोरोलानं 17 मे रोजी आपला नवा स्मार्टफोन मोटो जी4 प्लस लाँच केला होता. याचवेळेस कंपनीने ही देखील घोषणा केली होती की, मोटो जी4 स्मार्टफोन जून महिन्यात उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन 22 जून पासून मिळणार आहे.
मोटोरोलानं ट्विटरवरुन याबाबत घोषणा केली आहे. 22 जून रोजी हा स्मार्टफोन फक्त ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन इंडियावरुन खरेदी करता येणार आहे. मोटो जी4चा 16 जीबीचा एकच व्हेरिएंट आहे. 2 जीबी रॅम असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 11,000 रु. असू शकते.
मोटो जी4 आणि जी प्लस यांचे फिचर्स जवळपास सारखेच आहेत. फक्त कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सर यामध्ये फरक आहे. मोटो जी4 मध्ये रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. जी प्लसमध्ये 16 मेगापिक्सल. याशिवाय प्लसमध्ये कॅमेरा लेजर ऑटोफोकस फीचरही आहे.
मोटो जी4 मध्ये 5.5 इंच फूल-एचडी 1920x1080 पिक्सल टीएफटी डिस्प्ले आहे. यामध्ये अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो सपोर्ट आहे. तसेच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 सपोर्टही आहे. यामध्ये 1.5 गीगाहर्त्झ ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 617 देण्यात आला आहे. यामध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या आधारे 128 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा 5 फ्रंट कॅमेरा आहे. तसेच बॅटरी 3000 mAh क्षमतेची आहे. कनेक्टिव्हिटीचा विचार केल्यास यामध्ये मायक्रो यूएसबी, 3.5 एमएस हेडसेट जॅक, ब्ल्यूटूथ 4.1, वाय-फाय, जीपीएस देण्यात आलं आहे.Taking a groupfie but camera won't fit everyone? Now #NeverMiss on groupfies. #MotoG4 coming on 22nd June @amazonIN pic.twitter.com/1668neNuMf
— Moto India (@Moto_IND) June 20, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement