एक्स्प्लोर
Advertisement
राज ठाकरेंची फेसबुकवर थेट 'व्हेरिफाईड' एण्ट्री
व्यंगचित्र, कामं, मतं, धोरणं आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी या फेसबुक पेजचा वापर केला जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अधिकृतरित्या फेसबुकवर पदार्पण केलं. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात एका भव्य सोहळ्यात राज ठाकरे यांचं फेसबुक पेज लाँच करण्यात आलं.
व्यंगचित्र, कामं, मतं, धोरणं आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी या फेसबुक पेजचा वापर केला जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.
यावेळी राज ठाकरेंनी इतक्या उशिरा फेसबुकवर का, या प्रश्नाचंही उत्तर दिलं. राज म्हणाले, “खरं तर मी वर्तमानपत्र, साप्ताहिकं, मासिकात रमणारा माणूस आहे. नव्या माध्यमांकडे माझं लक्ष होतं, पण त्याच्याकडे मी जात नव्हतो. माझ्या मनात वर्तमानपत्र, साप्ताहिक काढायचं मनात होतं. पण ते चालवणं मोठं काम आहे. त्यामुळे सोशल मीडियावर, फेसबुकवर यावं असं वाटलं, त्यामुळे आज फेसबुक पेज लाँच करतोय”
दाऊदला स्वत: भारतात यायचं आहे
राज ठाकरे यांनी फेसबुक लाँचिंग कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, "दाऊदला भारतात आणणारं असं मोदी सरकार सातत्याने थापा मारत आहे. पण दाऊदला स्वत:लाच भारतात यायचं आहे. दाऊद इब्राहिमला भारतात येऊन मातृभूमीत मरण्याची इच्छा आहे. त्याची केंद्र सरकारशी सेटलमेंट सुरु आहे. मात्र त्याला भारतात आणून आम्ही ओढून आणल्याचा दावे करुन, हे सरकार निवडूक लढवेल"
मोदी सरकार थापाडं
यावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. खोटं बोलून मोदी सरकार सत्तेत आलं. ज्या सोशल मीडियाचा वापर करुन हे सत्तेत आले, त्यांना आता हाच सोशल मीडिया गैर वाटू लागला आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
सध्या मोदींच्या ट्विटर अकाऊंटमधील 48 टक्के तर राहुल गांधींच्या अकाऊटंमधील 54 टक्के फॉलोअर्स फेक आहे, असं राज ठाकरेंनी नमूद केलं.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन का
मुंबई गुजरातला जोडण्याच्या जुन्या स्वप्नासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे. मुंबई-अहमदाबाद या मार्गावरच बुलेट ट्रेन का? मुंबईला जोडण्यासाठी देशातील अन्य शहरांचा पर्याय नव्हता का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
मुंबई आमची होती, आहे आणि राहणारच, मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्रभर धिंगाणा घालेन, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
देशभर शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांच्या करता काही करायचं सोडून लाख लाख कोटीच्या बुलेट ट्रेन्स का आणि कोणासाठी सुरु करताय?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
भाजपमधील मराठी नेते हुजरे
भाजपमध्ये काम करणारे मराठी नेते हुजरे झाले आहेत, त्यांना कशाचंही देणंघेणं नाही. ते स्वाभिमान गमावून बसले आहेत.भाजपचा सध्याचा डोलारा हा उलटा पिरॅमिड आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
बायको म्हणते हसत जा, पण मी म्हणतो न हसायला मी अजित पवार आहे का?: राज ठाकरे
वर्तमानपत्र किंवा साप्ताहिक काढायचं मनात होतं,
पैशाच्या जोरावर अनेकांनी सोशल मीडियाचा वापर केला
फेसबुकवर जे करु ते खरं असेल, कोणतेही आकडे फुगवलेले नसतील
मोदींच्या ट्विटर अकाऊंटमधील 48 टक्के तर राहुल गांधींच्या अकाऊटंमधील 54 टक्के फॉलोअर्स फेक
अंगाशी आल्यावर अमित शाह सांगतात सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत हे बोलणारा पहिला माणूस मी आहे
मोदी पंतप्रधान होण्याआधी घराघरातून लोखंड जमा केलं, कुठे आहे सरदार वल्लभभाईंचा पुतळा? : राज ठाकरे
मोदी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार होते, त्याचं काय?
योगा झाला, स्वच्छ भारत अभियान झालं, आता काय तर फुटबॉल : राज ठाकरे
भारत स्वच्छ झाला पाहिजे, त्याआधी केंद्र, राज्य सरकार, मंत्रालय आणि महापालिका स्वच्छ करा
भाजपने फुटबॉल वाटले आणि काँग्रेसने सिंधुदुर्गात लाथ मारली, आता दोन्ही गोली म्हणतात तो बॉल माझ्याकडे नको, राज ठाकरेंची नारायण राणेंवर टीका
मुंबई गुजरातला जोडण्याच्या जुन्या स्वप्नासाठी बुलेट ट्रेनचा घाट
भाजपमध्ये काम करणारे मराठी नेते हुजरे, त्यांना कशाचंही देणंघेणं नाही
भाजपचा सध्याचा डोलारा हा उलटा पिरॅमिड आहे : राज ठाकरे
दक्षिणेकडील प्रत्येक राज्य त्यांच्या भाषेसाठी आग्रही, कर्नाटकात मेट्रोच्या वेळेला हिंदी लादायचा प्रयत्न केला तेंव्हा तिथला कानडी समाज एकवटला आणि हिंदी काढून कन्नड मध्ये फलक लावायला लावले : राज ठाकरे
या देशासमोर, राज्यसमोर अनेक प्रश्न असताना ते सोडवायचे सोडून हिंदी भाषा लादण्यासाठी कसले प्रयत्न करताय?
उद्या चांगली गोष्ट घडली, तर इथेच अभिनंदन करेन, चुकीचं केलंत, तर चाबूक काढने : राज ठाकरे
दाऊदला स्वत:ला भारतात यायचं आहे,त्याची केंद्र सरकारशी सेटलमेंट सुरुय : राज ठाकरे
दाऊद इब्राहिमला भारतात येऊन मातृभूमीत मरण्याची इच्छा
दाऊद इब्राहिमला भारतात स्वतःहून यायचंय, त्याची इच्छा आहे, सध्या त्याच्याशी चर्चा चालू आहे, त्याला भारतात आणून आम्ही ओढून आणल्याचे दावे करुन, हे सरकार निवडूक लढवेल
जपानच्या पंतप्रधानांना दिल्लीत भेटायचं सोडून अहमदाबादला का भेटताय?जपानच्या पंतप्रधानांना गुजरातच्या प्रचाराला वापरताय?
बाळासाहेब म्हणायचे व्यंगचित्रकार तो असतो जो दोन ओळींमधली वाचतो, त्या ओळींमधला अर्थ मला तुम्हाला फेसबुक पेजद्वारे सांगायचा आहे
देवेंद्र फडणवीस म्हणाले २ वर्षात ३० हजार विहिरी खोद्ल्यात, मुंबईतले खड्डे पण विहिरी म्हणून मोजल्यात का?
देशभर शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांच्या करता काही करायचं सोडून लाख लाख कोटीच्या बुलेट ट्रेन्स का आणि कोणासाठी सुरु करताय?
मुंबई आमची होती, आहे आणि राहणारच, मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्रभर धिंगाणा घालेन: राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement