एक्स्प्लोर
Advertisement
मारुती इंडिया पुढील वर्षापासून डिझेल कारची निर्मिती आणि विक्री बंद करणार
एप्रिल 2020 पासून प्रदूषणविषयक ‘बीएस-6’ नियमावली लागू होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून कंपनी डिझेल वाहनांचे उत्पादन पूर्णपणे थांबवेल.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती इंडियाने पुढील एप्रिल महिन्यापासून डिझेल कार निर्मिती आणि विक्रीवर बंदी आणणार असल्याचे सांगितले आहे. सध्या या कंपनीकडून डिझेलच्या कित्येक मॉडेल्सची विक्री आणि निर्मिती होत आहे. भारतात या एकट्या कंपनीकडून जवळपास 23 टक्के डिझेल वाहनांची विक्री होते.
एप्रिल 2020 पासून प्रदूषणविषयक ‘बीएस-6’ नियमावली लागू होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून कंपनी डिझेल वाहनांचे उत्पादन पूर्णपणे थांबवेल. नवीन प्रदूषणविषयक कठोर नियमावलीचे पालन करायचे झाल्यास डिझेल वाहनाचा उत्पादन खर्च लक्षणीय वाढेल आणि ग्राहकांसाठी हा व्यवहार्य पर्याय ठरणार नाही, असे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले आहे.
मारुती सुझुकीचे देशामध्ये प्रवासी वाहनविक्रीत असलेले अनेक मॉडेल्स डिझेल इंधनावर चालणारे आहेत. पेट्रोलच्या तुलनेत यांचे डिझेलचे मॉडेल महाग असले तरी, इंधन किमती परवडत असल्याने डिझेल कारला खरेदीदारांची पसंती असते. डिझेल इंजिनाला BS-VI नियमावलीच्या अंतर्गत अपग्रेड करण्यासाठी खूप जास्त खर्च येणार आहे. यामुळे मॉडल्सच्या किमतीत वाढ करणे आवश्यक आहे. किंमत वाढविल्याने विक्रीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे कंपनीने डिझेल इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मारुती सुझुकीचा देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारपेठेत 51 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे आणि डिझेल कारच्या विक्रीचा कंपनीच्या वार्षिक महसुलात 23 टक्के हिस्सा आहे.
मारुती कंपनी आता डिझेल कारऐवजी पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटसोबत काही नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement