एक्स्प्लोर
महिंद्राच्या 'या' कार बंद होणार?
कार कंपनी महिंद्रा येत्या काही काळात आपल्या लो परफॉर्मंस कारचं उत्पादन बंद करण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : कार कंपनी महिंद्रा येत्या काही काळात आपल्या लो परफॉर्मंस कारचं उत्पादन बंद करण्याच्या तयारीत आहे. अशीही चर्चा आहे की, नूवोस्पोर्ट, वेरिटो, वाइब आणि झायलो या कार बंद होण्याची शक्यता आहे. सध्या या कारची फार विक्री होत नसल्याचं दिसत आहे.
याबाबतच महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे एमडी पवन गोयंका म्हणाले की, 'आम्ही सर्व कारला बीएस-6 मानकांवर नेऊ. तसेच आम्ही असाही निर्णय घेतला आहे की, आम्ही काही लो-परफॉर्मेंस प्रोडक्ट बंद करणार आहोत.'
असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे की, महिंद्रा झायलोच्या जागी कोडनेम यू321 ही नवी कार लाँच करु शकते. ही कार टेस्टिंगदरम्यान, अनेकदा पाहायला मिळाली आहे.
महिंद्रा सध्या सर्व 4-मीटर एसयूव्ही एस 201 वर काम करत आहे. यामध्ये 5-सीटर आमि 7-सीटर असे दोन ले आऊट असणार आहे. दुसरीकडे असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे की, एस 201 ही नूवोस्पोर्टच्या जागी लाँच केली जाऊ शकते.
दरम्यान, महिंद्राशिवाय इतर कंपन्याही आपल्या लो-परफॉर्मेंस कार बंद करु शकतात.
बातमी सौजन्य : cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement