एक्स्प्लोर
Advertisement
तब्बल 4000mAh क्षमतेची बॅटरी, लेनोव्हो K8 लाँच
या नव्या फोनची किंमत 10 हजार 499 रुपये ठेवण्यात आली असून ऑफलाईन विक्रीसाठी हा फोन उपलब्ध आहे.
नवी दिल्ली : लेनोव्होने भारतात के सीरिजचा नवा स्मार्टफोन के 8 लाँच केला आहे. कंपनीने याच महिन्यात लेनोव्हो के 8 प्लस हा स्मार्टफोन लाँच केला होता. या दोन्ही फोनची डिझाईन जवळपास सारखीच आहे. या नव्या फोनची किंमत 10 हजार 499 रुपये ठेवण्यात आली असून ऑफलाईन विक्रीसाठी हा फोन उपलब्ध आहे.
4000mAh क्षमतेची बॅटरी हे या फोनचं वैशिष्ट्य असेल. शिवाय 2.3GHz हेलियो पी-20 ऑक्टा कोअर प्रोसेसर यामध्ये देण्यात आलं आहे. या फोनच्या बाजूला देण्यात आलेल्या म्यूझिक बटणमध्ये कॅमेरा, फ्लॅशलाईट आणि स्क्रीनशॉट फीचर्स देण्यात आले आहेत.
लेनोव्हो के 8 चे फीचर्स
- अँड्रॉईड 7.1.1 नॉगट
- 5.2 इंच आकाराची स्क्रीन
- 3GB रॅम, 32GB इंटर्नल स्टोरेज
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 2.3GHz हेलियो पी-20 ऑक्टा कोअर प्रोसेसर
- 4000mAh क्षमतेची बॅटरी
- फिंगरप्रिंट स्कॅनर
- ड्युअल सिम स्लॉट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement