एक्स्प्लोर
रिलायन्स जिओच्या 'फ्री' स्मार्टफोनबाबत पाच खास गोष्टी
जिओ लाँच झाल्यानंतर मोबाइल इंटरनेट वापरामध्ये भारतानं अमेरिका आणि चीनलाही मागे टाकलं आहे.
![रिलायन्स जिओच्या 'फ्री' स्मार्टफोनबाबत पाच खास गोष्टी Launch Free Reliance Jio Smartphone Know Five Big Things Latest Update रिलायन्स जिओच्या 'फ्री' स्मार्टफोनबाबत पाच खास गोष्टी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/21131731/reliance-jio.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुंबईतील एका विशेष बैठकीत मुकेश अंबानी यांनी ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली. रिलायन्स जिओनं फुकटात स्मार्टफोन लाँच करण्याचं यावेळी जाहीर केलं. या घोषणेमुळे टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे. जाणून घ्या 'फ्री' स्मार्टफोनबाबतच्या खास पाच खास गोष्टी
1. द जिओ फोन लाँच
द जिओ फोन या नावानं हा फोन लाँच करण्यात आला आहे. 24 ऑगस्टपासून या फोनचं प्री बुकींग सुरु होणार आहे. याआधी 1500 रुपये डिपॉझिट म्हणून जमा करावे लागणार आहेत. कंपनीचा असा दावा आहे की, हा फोन 100 टक्के 4G VoLTE फोन आहे.
2. 'डिजिटल मीडियाचं स्वप्न पूर्ण होणार'
यावेळी बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, हा फोन पंतप्रधान नरेंद्र मोदींचं डिजिटल मीडियाचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. या फोनच्या माध्यमातून लोकं आपलं बँक खातं, जन-धन खातंही जोडू शकतात. या वर्षीच्या शेवटपर्यंत हा फोन भारतातच तयार केला जाईल.
3. अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मिळणार
जिओ फोनवर अनलिमिटेड डेटाची ऑफर मिळणार आहे. 153 रुपयाच्या धन धना धन प्लान आणून जिओ फोन यूजर्सला अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मिळणार आहे. तसेच जिओ नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंग नेहमी मोफत असणार आहे.
4. 4जी इंटरनेटसारखे फीचर्स
हा फोन लाँच झाल्यानंतर रिलायन्सचं यूजर बेस मजबूत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या फोनमध्ये जिओ टीव्ही देखील असणार आहे. याशिवाय या फोनमध्ये इंटरनेट टीथिंग्र, व्हिडीओ कॉलिंग यासारखे फीचर्स असणार आहेत.
5. भारतानं अमेरिका आणि चीनला मागे टाकलं: मुकेश अंबानी
यावेळी बोलताना मुकेश अंबानी यांनी असा दावा केला आहे की, जिओ लाँच झाल्यानंतर मोबाइल इंटरनेट वापरामध्ये भारतानं अमेरिका आणि चीनलाही मागे टाकलं आहे. गेल्या सहा महिन्यात 120 कोटी जीबी इंटरनेट डेटा वापरण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!
रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोनअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)