एक्स्प्लोर
हात नसलेल्यासाठी 'कीबोर्ड माउस इम्युलेटर' एक अनोख उपकरण
अनेकदा अपघातात हात गमावल्याने किंवा मग दिव्यांग असलेल्या व्यक्तीला हाताचा पंजा नसेल तर संगणक प्रशिक्षण किंवा संगणक नेमकं कसा चालवायचं हा प्रश्न निर्माण होतो. यावर मुंबईच्या अनिल नेने यांनी जगातील पहिल 'कीबोर्ड माउस इम्युलेटर' नावाचे उपकरण तयार केलं आहे.
मुंबई : अपघातात संपूर्ण हात गमावलेल्या व्यक्तींना किंवा मग दिव्यांग व्यक्ती जे हाताचा पंजा नसल्याने संगणकाचा कीबोर्ड हाताळू शकत नाही. अशा व्यक्तींना संगणक युगात संगणकाचा वापर कसा करायचा असा प्रश्न निर्माण होतो. आता यावर उपाय म्हणून विलेपार्ले येथे राहणाऱ्या अनिल नेने या इलेक्ट्रिकल इंजिनियरने 'कीबोर्ड माऊस इम्युलेटर' हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाचा वापर करून हात नसलेला माणूस सहज संगणक हाताळू शकतो.
'कीबोर्ड माऊस इम्युलेटर' हे मॅग्नेटिक स्विच आणि अक्रेलीकच्या साहाय्याने तयार केले आहे. हे यूएसबी पोर्टच्या साहाय्याने संगणकाला जोडला जातो. तसेच एक स्विच पॅड इम्युलेटरला जोडले जाते. त्यावर डायरेक्शन, मूव्ह, एन्टर असे तीन स्विच दिलेले असतात. लोहचुंबक असलेली कापडी पट्टी (मॅग्नेट होल्डर) हाताला बांधून त्याच्या वापर आपण पंजा सारखा करू शकता. या मॅग्नेट होल्डरच्या साहाय्याने तिन्ही स्विच वापरता येतात. इम्युलेटरच्या स्क्रिनवर सर्व इंग्रजी मुळाक्षरे, अंक लिहिलेले असतात. त्यासोबतच माऊस, अल्फा, कंट्रोल, एन्टर, फंक्शन्स, ड्रॅग, बॅक, कॅप्स, सिम्बॉल, मेल हे सर्व पर्याय डिस्प्ले स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील.
हे उपकरण वापरण्याकरिता कुठल्याही बॅटरी किंवा अॅडप्टरची गरज नाही. शिवाय, हे उपकरण वापरणाऱ्या व्यक्तीला शब्द लवकरात लवकर टाइप करता यावे यासाठी एखाद्या शब्दाची पहिली चार अक्षरे लिहिल्यानंतर 'ऑटो कम्प्लिट' च्या साहाय्याने संभाव्य शब्दांचे काही पर्याय उपलब्ध होतात.
'कीबोर्ड माऊस इम्युलेटर' हे हात नसलेल्यांसाठी तयार करण्यात आलेले जगातील पहिले उपकरण आहे, असा नेने यांचा दावा आहे. याची किंमत साधारण 10 हजार रुपये आहे.
या उपकरणामुळे अगदी कमी किंमतीत संगणक, इंटरनेट सारख्या माध्यमंचा वापर दिव्यांग व्यक्तीकडून सहज केला जाऊ शकतो आणि त्यांच्यासाठी करिअरच्या, रोजगाराच्या संधी सुद्धा मोठ्या संख्येने उपलब्ध होऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
विश्व
बीड
Advertisement