एक्स्प्लोर
भीम अॅपसह कार्बन K9 कवच 4G लाँच, किंमत फक्त...
नवी दिल्ली : कार्बनने आज एनपीसीआय अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत भागीदारीची घोषणा करत कार्बन K9 कवच 4G हा स्मार्टफोन लाँच केला. विशेष म्हणजे या फोनमध्ये प्री इंस्टॉल्ड भीम अॅप असणार आहे.
या 4G स्मार्टफोनची किंमत फक्त 5 हजार 290 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्वस्त 4G स्मार्टफोनमुळे आता भीम अॅप वापरणं प्रत्येकाला शक्य होणार आहे.
ग्राहकांना आता कधीही आणि कुठेही भीम अॅपद्वारे बँक अकाऊंटमधील रक्कम पाहता येईल. शिवाय सोप्या पद्धतीने पैसेही ट्रान्सफर करता येतील.
भारतात डिजीटल पेमेंट वाढवण्याच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल आहे, असं एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. पी. होता यांनी सांगितलं.
कार्बन K9 कवच 4G चे फीचर्स :
- 7.0 अँड्रॉईड नॉगट सिस्टम
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- 1.25GHz क्वाड-कोर प्रोसेसर
- 1 GB रॅम
- 8 GB इंटर्नल स्टोरेज
- ड्युअल सिम
- फिंगरप्रिंट सेन्सर
- 5 मेगापिक्सेल फ्रंट आणि रिअर कॅमेरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement