एक्स्प्लोर
Advertisement
दोन हजारच्या नोटेवरची ही 'सोनम गुप्ता' आहे कोण?
मुंबई : चलनी नोटांवर कोणताही मजकूर लिहू नये, असं आवाहन वारंवार केलं जाऊनही अनेक जण त्यावर वाह्यातपणे लिहीत असल्याचं पाहायला मिळतं. नुकत्याच दोन हजार रुपयांच्या नोटा वापरात आल्या आहेत, मात्र नको तिथे 'क्रिएटिव्हिटी' दाखवण्याची टवाळखोरांची खोड इथेही मध्ये आली आहे.
'सोनम गुप्ता' या नावाने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे. दोन हजारच्या नोटेपासून पाचशे, शंभर, दहा रुपयांच्या नोटांवर सोनम गुप्ताच्या बेवफाईचे दाखले पाहायला मिळत आहेत. अत्यंत चीड आणणारा हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'सोनम गुप्ता बेवफा है' असा मजकूर लिहिलेल्या दोन हजारांच्या नव्या कोऱ्या नोटेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही जणांसाठी हा हास्यविनोदाचा भाग आहे, तर काही जणांनी नव्या कोऱ्या नोटांवर वाह्यात मजकूर लिहिल्याबद्दल संतापही व्यक्त केला आहे.
'सोनम गुप्ता'बद्दलच्या मेसेजेसचा कहर म्हणजे सोनम गुप्ताच्या नावाने फिरणारं उत्तर. 'हां हूं मैं बेवफा..... सोनम गुप्ता' पासून 'मैं बेवफा नहीं हूं, मेरी कुछ मजबूरियां थीं' अशी उत्तर लिहिलेल्या नोटांचे फोटोही फिरत आहेत.
त्यामुळे नोटांवर लिहू नये, असं आवाहन वेळोवेळी करुनही लोकांची मानसिकता कधी बदलणार, हा प्रश्न कायम आहे.
पाहा आणखी फोटो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement