एक्स्प्लोर

जिओची प्राईम मेंबरशीप न घेतल्यास काय होईल?

मुंबई : रिलायन्स जिओने प्राईम मेंबरशीप ऑफर लाँच केली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना 1 एप्रिल 2018 पर्यंत 'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरचा लाभ घेता येईल. 170 दिवसात 10 कोटी ग्राहक जोडल्याच्या निमित्ताने जिओने ही घोषणा केली आहे. 99 रुपयांची प्राईम मेंबरशीप घेतल्यानंतर 303 रुपये प्रति महिना दराने 'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरचा लाभ एक वर्षासाठी म्हणजे 1 एप्रिल 2018 पर्यंत घेता येईल. 31 डिसेंबरला 'वेलकम ऑफर' संपल्यानंतर 1 जानेवारीपासून 'हॅप्पी न्यू ईयर' ही ऑफर लाँच करण्यात आली होती. 'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरनुसार सध्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत प्रति दिन 1GB डेटा आणि मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. प्राईम मेंबरशीप न घेतल्यास काय होईल? 1 मार्च ते 31 मार्च या काळात प्राईम मेंबरशीपसाठी नोंदणी करता येईल. मात्र मेंबरशीप न घेतल्यास तुमचं जिओ सिम प्रीपेड किंवा पोस्टपेडमध्ये बदलण्यात येईल. त्यानुसार तुम्हाला जिओच्या टेरिफ प्लॅननुसार रिचार्ज करावं लागेल. सप्टेंबर 2016 मध्ये जिओने टेरिफ प्लॅन लाँच केले होते. टेरिफ प्लॅननुसारही व्हॉईस कॉलिंग मोफत असेल, केवळ डेटाचे पैसे मोजावे लागतील. jio_gfx काय आहेत टेरिफ प्लॅन? 50 रुपयात 1GB 4G डेटा, 999 रुपयात 10GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा), 1499 रुपयात 20GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा), 2499 रुपयात 35GB डेटा (रात्री अनलिमिटेड डेटा) जिओ प्राईम मेंबरशीप कुणाला घेता येईल? जिओच्या प्राईम मेंबरशीपचा लाभ सध्याच्या 10 कोटी ग्राहकांना आणि 31 मार्चपर्यंत नवीन कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना मिळेल. यासाठी नोंदणी प्रक्रिया 1 मार्चला सुरु करण्यात येईल, तर 31 मार्च अंतिम तारीख असेल. प्राईम मेंबरशीपसाठी जिओ युझर्सला 99 रुपये मोजावे लागतील, तर एक वर्षासाठी ही मेंबरशीप असेल. जिओ प्राईम मेंबरशीप कशी मिळवाल? प्राईम मेंबरशीप जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवरुन मिळवता येईल. शिवाय जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल. जिओ प्राईम मेंबरशीपचे फायदे मेंबरशीप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप एक वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल, असं अंबानींनी सांगितलं. मेंबरशीप घेतल्यास 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा (1GB प्रतिदिन) वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे.

संबंधित बातमी : 1 एप्रिलपासून व्हॉईस कॉलिंग मोफत, अंबानींकडून नव्या ऑफरची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lai Bhari Award 2024 : सुपर डुपर डान्स ते खतरनाक शायरी : लय भारी पुरस्कार 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-Rajan Salvi Shiv Sena UBT : ठाकरेंना मोठा धक्का बसणार? राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीतDevendra Fadnavis : माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ, लवकरच महाराष्ट्र माओवाद मुक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
Manoj Jarange Patil: वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
Embed widget