एक्स्प्लोर
जिओफाय हॉटस्पॉट आता अवघ्या 499 रुपयांत
जिओफाय हॉटस्पॉटची किंमत कमी केली गेली आहे. आता अवघ्या 499 रुपयांत ग्राहकांना जिओफाय हॉटस्पॉट खरेदी करता येणार आहे.
मुंबई : रिलायन्स जिओने मार्च महिन्यात जिओफाय हॉटस्पॉटची सुविधा 999 रुपयांच्या किमतीसह ग्राहकांसाठी उपलब्ध केली होती. या जिओफाय हॉटस्पॉटची किंमत कमी केली गेली आहे. आता अवघ्या 499 रुपयांत ग्राहकांना जिओफाय हॉटस्पॉट खरेदी करता येणार आहे.
जिओफाय हॉटस्पॉट डिव्हाईसवर एक वर्षाची वॉरंटीदेखील देण्यात आली आहे. ग्राहकांना या हॉटस्पॉट डिव्हाईसवर 150 एमबीपीएस डाऊनलोड स्पीड तर 50 एमबीपीएसचे अपलोड स्पीड मिळू शकतं, असं कंपनीचं म्हणणं आहे.
कंपनीने जिओफाय हॉटस्पॉटची किंमत कमी केली असली तरी ही ऑफर मिळण्यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत.
ऑफरचा फायदा कोणाला ?
जे ग्राहक जिओचे पोस्टपेड कनेक्शन घेतील आणि नंतर त्याचा वापर जिओफाय डिव्हाईसमध्ये करतील, अशा ग्राहकांनाच या ऑफरचा फायदा मिळू शकेल.
ऑफरसोबत कॅशबक
जिओ पोस्टपेड ग्राहकांना या ऑफरसोबतच कॅशबॅकही मिळणार आहे. पाठोपाठ 12 बिलिंग सायकल पूर्ण केल्यावर ग्राहकांना 500 रुपये कॅशबॅक मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement