एक्स्प्लोर
जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही!
1500 रुपये अनामत रक्कम ठेवून हा फोन मोफत दिला जाणार आहे. मात्र असं असलं तरी या फोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
![जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही! Jio Phone Will Not Whatsapp Support Comes With 500mb 4g Data Limit जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/23105410/JIO3-580x395-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रिलायन्स जिओचा मच अवेटेड व्हॉईस कमांडिंग 4G फीचर फोन लाँच करण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या फोनची घोषणा केली. 24 ऑगस्टपासून या फोनची प्री बुकिंग करता येणार आहे. महिन्याला केवळ 153 रुपयांमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. मात्र केवळ 500 एमबीपर्यंतच हायस्पीड डेटा मिळेल, त्यानंतर स्पीड कमी होईल, अशी माहिती समोर आली आहे.
1500 रुपये अनामत रक्कम ठेवून हा फोन मोफत दिला जाणार आहे. मात्र असं असलं तरी या फोनमध्ये व्हॉट्सअप चालणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअप यूझर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअप वापरणाऱ्यांना हा फोन निराश करु शकतो. मात्र या फोनमध्ये कंपनीचं जिओ चॅट हे अप येणार आहे.
जिओचा फोन कसा बुक कराल?
जिओ फोन 15 ऑगस्ट रोजी रोल आऊट होईल. मात्र या फोनचं प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून Myjio App वर किंवा रिलायन्स स्टोअरमध्ये जाऊन करता येईल. ‘पहिला येईल त्याला प्राधान्य’ या तत्वावर सप्टेंबरपासून या फोनची प्रत्यक्ष विक्री सुरु होईल. म्हणजेच जो ग्राहक अगोदर फोन बुक करेन, त्यालाच अगोदर फोन मिळेल.
जिओ फोन कसा आहे?
रिलायन्सने जिओप्रमाणे आज आणखी एक धमाका केला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा 4G VoLTE फीचर फोन लाँच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा फोन फुकटात मिळणार आहे. मात्र त्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील.
जिओचा हा फोन टीव्हीला जोडता येणार आहे.
याशिवाय जिओने 153 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. जिओ फोनवर अवघ्या 153 रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.
रिलायन्सची आज नवी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुकेश अंबानींनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. यापैकी महत्त्वाची घोषणा म्हणजे रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोन.
फीचर्स काय असतील?
फीचर फोन हा जिओचा स्वस्त फोन असणार आहे. ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल.
512 MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा, 2000mAh क्षमतेची बॅटरी, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील.
संबंधित बातमी :
‘डेटागिरी’नंतर डिजीटल फ्रीडम, अंबानींकडून घोषणांचा पाऊस
भरसभेत कोकिलाबेन यांना अश्रू अनावर!
रिलायन्सचा धमाका, फुकटात 4G फोन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)