स्वातंत्र्य दिनी Jio ची खास ऑफर; वर्षभरात 2.5GB डाटा अन् बरंच काही
Jio 2999 Independence Offer 2022 : या प्लानमध्ये दररोज 2.5 GB डेटा मिळतो. प्लानची वैधता 365 दिवसांची आहे. दररोज 100 एसएमएस व्यतिरिक्त प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.
Jio 2999 Independence Offer 2022 : रिलायंस जियोनं (JIO) स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. जियोनं '2999 Independence Offer 2022' रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. जियोच्या या प्लानचा फायदा प्री-पेड कस्टमर्सना होऊ शकतो. या प्लानची किंमत 2,999 रुपये आहे. कंपनीनं म्हटलंय की, या प्लानमध्ये ग्राहकांसाठी 100 टक्के वॅल्यू बॅकही देण्यात आली आहे. जाणून घेऊया जियोच्या या प्लानबाबत सविस्तर...
प्लानमध्ये मिळणार Netmeds, AJIO, Ixigo चे कूपन्स
JIO च्या या प्लानमझ्ये 75 जीबी डाटासोबत Netmeds, AJIO, Ixigo चे रिडीम कूपनही दिले जाणार आहेत. हे कूपन रिचार्ज केल्यानंतर 72 तासांच्या आत माय जियो अॅप (My Jio App) मध्ये क्रेडिट होतील. जियोच्या या प्लानमध्ये तुम्हाला 75 जीबी डाटा वाऊचरही मिळेल. ज्याचा वापर तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा करु शकता. या ऑफर अंतर्गत 25 टक्क्यांच्या सुटीसह Netmeds चे तीन कूपन दिले जातील. या कूपनच्या मदतीनं तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल.
मिळणाऱ्या कूपन्सबाबत माहिती
नेटमेड्सचे कूपन 9 ऑगस्टपासून 31 ऑक्टोबरपर्यंत valid आहेत. Ixigo सोबत 750 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. जर तुम्ही या साईटवरुन 4500 रुपये किंवा त्याहून अधिक किमतींच्या फ्लाइट तिकीट बुक करु शकतो. त्यामुळे आपल्याला 750 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. याव्यतिरिक्त Ajio वर 1,000 रुपयांची सूट मिळणार आहे.
जिओच्या या 2,999 रुपयांच्या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये तुम्हाला दररोज 2.5 GB डेटा मिळतो. या प्लानची वैधता 365 दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस व्यतिरिक्त सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय डिस्ने + हॉटस्टार सब्स्क्रिप्शन देखील एक वर्षांसाठी उपलब्ध असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Reliance Jio 5G : जिओकडून 1000 शहरांमध्ये 5G सेवा देण्यासाठी चाचणी पूर्ण, मुंबईसह 'या' शहरांमध्ये मिळणार फास्ट इंटरनेट
- Esports : भारतात ई-स्पोर्ट्सचा वाढता प्रसार, आशियाई खेळ, कॉमनवेल्थच्या ई-स्पोर्ट्समध्ये टीम इंडियाचा सहभाग
- Crypto Regulation: क्रिप्टोकरन्सी समजून घेण्यासाठी भारताला वेळ का लागतोय? इतरांनी त्यापासून काय शिकलं पाहिजे?
- Independence Day 2022 : 75 व्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देण्यासाठी 'असे' डाऊनलोड आणि शेअर करा WhatsApp स्टिकर्स