एक्स्प्लोर
Advertisement
दाताने बॅटरी चेक करणं महागात, आयफोनची बॅटरी तोंडातच फुटली
या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. बॅटरीच्या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
बीजिंग : जुन्या आयफोनची बॅटरी खरी आहे की नाही, हे दाताने दाबून तपासणं एका व्यक्तीला महागात पडलं आहे. या व्यक्तीने फोन तोंडातून बाहेर काढताच त्याचा स्फोट झाला.
ही घटना चीनच्या एका सेकंड हॅण्ड इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील आहे. डोळ्याची पापणी मिटताच आयफोनच्या बॅटरीचा स्फोट झाला. आयफोनमधील लीथियम बॅटरी युजर स्वत: काढू शकत नाही. त्यामुळे टेक्निशनच सावधरित्या ही बॅटरी काढून दाखवू शकतो.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ती व्यक्ती एका स्त्रीसोबत दिसत आहे. बॅटरी तपासण्यासाठी ती तोंडात ठेवून दाबून पाहत असताना त्यात स्फोट होतो.
या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. बॅटरीच्या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बॅटरी फारच जुनी होती. पण ती खरी होती की बनावट होती हे समजू शकलेलं नाही.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement