एक्स्प्लोर
iPhone 7 निळ्या रंगात
मुंबई: अॅपल आयफोनचे जगभरात लाखो-करोडो चाहते आहेत. त्यामुळे कंपनी आपल्या चाहत्यांना नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करीत असते. आयफोन 7 ची सारेजण वाट पाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून आयफोन 7बाबत बऱ्याच गोष्टी लीक होत आहे.
यंदा अॅपल आयफोन 7च्या निमित्तानं मोठा बदल करण्याची शक्यता आहे. आयफोनचा स्पेस ग्रे हा रंग त्याची खरं तर ओळख होती. पण आता हाच रंग आयफोन हद्दपार करणार आहे. त्याऐवजी निळ्या रंगात आयफोन 7 पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आयफोन आपल्या डिझाइनमध्येही बदल करणार आहे. तसंच ड्यूल लेन्स कॅमेराही असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
आयफोन 7 निळ्या रंगात येतो की आपल्या पूर्वीच्याच रंगामध्ये हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement