एक्स्प्लोर
अँड्रॉईड नॉगट 7 ओएस, 'या' स्मार्टफोनची किंमत फक्त 4199 रुपये!
मुंबई: मोबाइल कंपनी इंटेक्सनं आपला अॅक्वा A4 हा बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. याची किंमत अवघी 4,199 रुपये आहे.
हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त अँड्रॉईट नॉगट 7 स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 इंच डिस्प्ले देण्यात आलं असून याचं 480x800 पिक्सल देण्यात आहे. तसेच यात 1.3 GHz क्वॉड कोअर प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम देण्यात आली आहे. यामध्ये 8 जीबी इंटरनल मेमरी असून 64 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
यामध्ये 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. 4G VoLTE स्मार्टफोनमध्ये 1750 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
इंटेक्स टेक्नोलॉजीचे संचालक आणि व्यवसाय प्रमुख निधी मार्कंडेय यांनी सांगितलं की, 'सगळ्यात नव्या अँड्रॉईड ओएससह सर्वात कमी किंमतीचा स्मार्टफोन लाँच केला आहे.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement